INS Vikrant
INS Vikrant esakal
देश

INS Vikrant: नौदलात दाखल होताच मोदींचं उर भरून येणारं ट्विट

सकाळ डिजिटल टीम

INS विक्रांत अधिकृतपणे नौदलात सामील झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ मध्ये आयएनएस विक्रांतच्या कमिशनिंग सोहळ्याची झलक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आनावरन झाले. आणि पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका देशाला समर्पित केली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटर वरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि त्याला कॉप्शन दिल आहे की, भारतासाठी एक ऐतिहासीक दिवस आहे. शुक्रवारी जेव्हा मी INS विक्रांतवर गेलो होतो तेव्हा ऐवढा गर्व झाला होता, की तो शब्दात मांडू शकत नाही.

व्हिडिओमध्ये शौर्याची झलक

मोदींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कमिशनिंग सोहळ्याची झलक आहे. हा व्हिडिओ भारतीय नौदलाचे अदम्य धैर्य, अद्भुत वारसा आणि, अतुलनीय शौर्याने परिपूर्ण आहे. हा व्हिडिओ 2 मिनीट 52 सेकंदाचा आहे, या कार्यक्रमाच्या सर्व क्षणांचा यात सामावेश आहे. आयएनएस विक्रांत देशाला समर्पित करताना मोदी म्हणाले होते.

विक्रांत ही केवळ एक युद्धनौका नाही, तर ती 21 व्या शतकातील भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचा दाखला आहे. ज्या सक्षम, समर्थ आणि सामर्थ्यवान भारताचे स्वप्न आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य चळवळीत पाहिले होते. विक्रांत हे त्याचे जिवंत चित्र आहे. महासागर आणि आव्हाने अनंत असतील तर भारताचे उत्तर विक्रांत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात अतुलनीय योगदान विक्रांतचे आहे.

भारतीय बनावटीच्या INS विक्रांतमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू स्वदेशी नहीत. काही भाग दुसऱ्या देशातून आयात करण्यात आले आहेत. विक्रांत ही 76 टक्के भारतीय बनावटीची आहे. विक्रांतच्या बांधकामासाठी लागणारे युद्धनौकेचे स्टील भारतीय लोखंड प्राधिकरणाने तयार केले आहे. हे लोखंड तयार करण्यासाठी भारतीय नौदल आणि संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेची मदतही घेण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT