PM Modi Speech Sakal
देश

PM Modi Speech : मित्रों, मेरे प्रिय देशवासियों ते मेरे प्यारे परिवारजनों! मोदींच्या भाषणातील बदललेल्या शब्दांमागचं रहस्य

त्यांनी यावेळी वेगवेगळ्या शब्दांचा वापर केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले आणि देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी ८९ मिनिटांचे भाषण केले पण त्यांच्या मागच्या भाषणांची तुलना केली तर या भाषणात त्यांची वेगळीच झलक पाहायला मिळाली आहे.

"मेरे प्यारे देशवासियों..." या वाक्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक भाषणाची सुरूवात करतात. पण आजच्या लाल किल्ल्यावरील भाषणात त्यांनी "मेरे प्यारे परिवारजनों..." या वाक्याचा वापर केला आहे. आपल्या दीड तासाच्या भाषणामध्ये त्यांनी अनेकदा या वाक्याचा वापर केला.

दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी खेळी खेळली असून देशवासियों या शब्दाऐवजी परिवारजनों हा शब्द वापरला आहे. देशवासियों असाही शब्द त्यांनी या भाषणात वापरला पण लगेच परिवारजनों हा शब्द वापरून त्यांनी भाषण पूर्ण केलं. इथून पुढे होणाऱ्या सभेतील भाषणामध्ये सुद्धा ते पिरवारजनों हा शब्द वापरतील अशी शक्यता आहे.

काय आहे यामागील रहस्य?

भाषणांत वापरलेल्या त्यांच्या नवीन शब्दांची त्यांनी चांगलीच तयारी केल्याचंही त्यांच्या भाषणातून दिसून आलं. परिवारजनों या शब्दातून त्यांनी सगळा देश माझा परिवार आहे आणि मी या परिवाराचा सदस्य आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सामान्य लोकांना भावणारा हा शब्द असल्यामुळे आपण देशातील जनतेसोबत असल्याचा संदेश त्यांनी भारतीयांना दिला असं म्हणता येईल. त्याचबरोबर मी माझ्या परिवाराच्या सुखदु:खात सहभागी असतो, परिवाराचा सदस्य बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदींनी विरोधकांनाही यावरून संदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT