pm narendra modi tells who successor of him in bihar maharajganj rally  Esakal
देश

PM Modi: PM मोदींचा राजकीय वारस कोण? अनेक दिवसांपासून सुरू होता वाद

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उत्तराधिकारीबाबतच्या चर्चेदरम्यान मोठं वक्तव्य केलं आहे. बिहारमधील महाराजगंज येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी त्यांचा राजकीय वारस कोण आहे ते सांगितले आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उत्तराधिकारीबाबतच्या चर्चेदरम्यान मोठं वक्तव्य केलं आहे. बिहारमधील महाराजगंज येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, माझा कोणीही उत्तराधिकारी नाही. देशातील जनता माझे उत्तराधिकारी आहेत. किंबहुना गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सातत्याने सांगत होते की, भाजपने पुन्हा सरकार स्थापन केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेपासून लांब होतील आणि सत्तेची कमान अमित शहा यांच्याकडे सोपवू शकतात.

बिहारमधील महाराजगंज येथील रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बिहार ही राजेंद्र प्रसादांची भूमी आहे, पण आरजेडी आणि काँग्रेसने ती वसूलीसाठी ओळखली आहे. या रॅलीत आलेल्या लोकांना प्रत्येक गावात जाऊन लोकांना सांगा की आम्ही मोदीजींच्या वतीने आलो आहोत, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. पुन्हा एनडीएचे सरकार आल्यास त्यांना घरे कशी मिळतील.

ही घरे घरातील महिलाच्या नावावर असतील. येणारी पाच वर्षे बिहारमध्ये समृद्धी घेऊन येणार आहेत. आमच्या बहिणी आता ड्रोन पायलट होतील आणि त्यांनी ड्रोनने शेती करून पायलट व्हावे, अशी योजना आम्ही आखली आहे. तीन कोटी बहिणींना लखपती दीदी बनवण्याची आमची हमी आहे.

या सभेत पंतप्रधान मोदींनी जनतेला स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी उमेदवारांकडे न पाहता पंतप्रधानांना निवडून द्यावे. तुमचे मत केवळ खासदार निवडण्यासाठी नाही तर पंतप्रधान निवडण्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.

इंडिया आघाडीवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशातील जनता पुढील 5 वर्षांसाठी पुन्हा निवडून देणार हे हे लोक सहन करू शकत नाहीत. 4 जूनची तारीख जसजशी जवळ येत आहे. या लोकांकडून मला मिळणाऱ्या शिव्याही वाढत आहेत. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी, विकसित बिहारसाठी आणि विकसित भारतासाठी हे सरकार खूप महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT