देश

भारताचा प्रत्येक खेळाडू हा विजेता; PM मोदींकडून जपानचंही कौतुक

विनायक होगाडे

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान सरकारचे आभार मानलेत. टोकियोमध्ये सुनियोजित पद्धतीने आयोजित केलेल्या ऑलम्पिक खेळांबद्दल त्यांनी हे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटलंय की, भारतीय खेळाडूंनी जिंकलेल्या पदकांमुळे देशाची मान उंचावली आहे. त्याचप्रमाणे, खेळांमधील नवीन प्रतिभा शोधण्यासाठी तळागाळात खेळांना अधिक लोकप्रिय करण्यासाठी सतत कार्यरत राहण्याची वेळ आली आहे, असंही त्यांनी म्हटलंय. टोकियो ऑलम्पिकच्या सांगता दिनाला नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करत हे म्हटलंय.

नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, टोकियो ऑलम्पिक २०२० ची आता सांगता होत आहे. मी भारतीय खेळाडूंच्या चमूचं शानदान कामगिरीबद्दल अभिनंदन करु इच्छितो. या खेळांमध्ये त्यांनी आपलं सर्वोत्तम कौशल्य, सांघिक कार्य समर्पण वृत्तीने व्यक्त केलंय. भारताचं प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक खेळाडू हा विजेता आहे. भारताने जिंकलेली पदके नक्कीच आपल्या राष्ट्रासाठी अभिमानास्पद आहेत आणि देशासाठी आनंदाचं कारण आहेत.

त्याचप्रमाणे, खेळांमधील नवीन प्रतिभा शोधण्यासाठी तळागाळात खेळांना अधिक लोकप्रिय करण्यासाठी सतत कार्यरत राहण्याची वेळ आली आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

पुढे त्यांनी जपान सरकारचं कौतुक करताना म्हटलंय की, जपानच्या सरकारचे आणि विशेषत: टोकियोचे सुनियोजित पद्धतीने खेळ आयोजित केल्याबद्दल विशेष आभार. कोरोनाच्या अशा काळात, इतक्या यशस्वीरित्या यजमानपद भुषवण्यासाठी लवचिकतेचा एक मजबूत संदेश जपानने दिलाय. खेळ हे एक एकात्मतेसाठी कसे उत्तम माध्यम आहे, हे देखील दाखवून दिलं गेलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT