NARENDRA MODI
NARENDRA MODI 
देश

खुशखबर! PM मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या पाठवणार पैसे

कार्तिक पुजारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री (Prime Minister Narendra Modi) किसान सन्मान निधीचा Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) नववा हफ्ता उद्या जाहीर करणार आहेत.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री (Prime Minister Narendra Modi) किसान सन्मान निधीचा Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) नववा हफ्ता उद्या जाहीर करणार आहेत. पंतप्रधान मोदी 9 ऑगस्टला साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगद्वारे पीएम किसान निधीची घोषणा करणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भातील माहिती दिलीये. पीएम किसान निधी योजनेंतर्गत 19,500 कोटी रुपये 9.75 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. (Natinal Latest Marathi News)

पंतप्रधान मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी मदतीचा नवा हफ्ता 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता जाहीर करतील. यामुळे 9.75 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 19,500 कोटी रुपये जमा होतील, असं अधिकृत निवेदनात सरकारकडून सांगण्यात आलं आहे. पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा केले जातात. चार महिन्यात एकदा अशी तीन हफ्त्यात ही रक्कम दिली जाते.

पीएम-किसान योजनेंतर्गत आतापर्यंत 1.38 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. याआधी मे महिन्यात 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात आलीये. पीएम-किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा स्थानिक नोडल अधिकाऱ्याकडे जाऊन शेतकरी या योजनेसाठी आपले नाव नोंदवू शकतो. लाभार्थी कोणाला ठरवायचं याबाबत निर्णय राज्य सरकारवर सोडण्यात आला आहे. लाभार्थींची यादी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येते. त्यानंतर केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 ऑगस्टला देशाला संबोधित करतील आणि काही लाभार्थ्यांशी चर्चा करतील. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हेही उपस्थित असतील अशी माहिती देण्यात आली आहे. कोरोना काळात अनेक व्यवसायांना फटका बसला. शेती क्षेत्रही यातून सुटू शकलेली नाही. या काळात पीएम-किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT