pm modi google
देश

योग दिन, जपान दौरा अन् बरंच काही; PM मोदींनी सांगितली 'मन की बात'

आज मन की बात मधून संवाद साधत असताना पंतप्रधान मोदी यांनी यावर्षीच्या योग दिनाची थीम सांगितली

सकाळ डिजिटल टीम

आज मन की बात मधून संवाद साधत असताना पंतप्रधान मोदी यांनी यावर्षीच्या योग दिनाची थीम सांगितली

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' च्या 89 व्या भागातून देशाला संबोधित केले. २६ मे रोजी देशातील मोदी सरकारला ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान, यासंदर्भात संवाद साधताना त्यांनी देशवासियांचे आभार मानले. मन की बात या कार्यक्रमाच्या मागील भागात पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या राजधानीतील नुकतेच उद्घाटन झालेल्या "प्रधानमंत्री संग्रहालय" चा उल्लेख केला. यावेळी त्यांनी देशाच्या माजी पंतप्रधानांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांचे आभार मानले.

आज मन की बात मधून संवाद साधत असताना पंतप्रधान मोदी यांनी यावर्षीच्या योग दिनाची थीम सांगितली आहे. 'मानवतेसाठी योगा', अशी यावर्षीची योग दिनाची थीम असणार आहे असंही त्यांनी सांगितले. 21 जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जाणार आहे. यावर्षीची थीम 'योगा फॉर ह्युमॅनिटी' अशी असणार आहे. त्यामुळे भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्यांनी योग दिनाचा भाग बनवण्याचे आवाहन केले आहे. योगाला तुमच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवा, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे.

पुढे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या जपान दौऱ्यासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी जपानला गेलो असता तेथील कार्यक्रमांमध्ये अनेक व्यक्तींना भेटण्याचा योग आला. हे नागरिक जपानचे असले तरी त्यांच्या मनात भारताप्रती कमालीची ओढ आणि प्रेम दिसले, अशी भावनाही मोदींनी यावेळी व्यक्त केली

पुढे ते म्हणाले, तुमच्या परिसरात कोणते महिला बचत गट कार्यरत आहेत ते शोधा. त्यांच्या उत्पादनांची माहितीही गोळा करा आणि शक्यतोवर या उत्पादनांचा वापर करा. या उत्पादनांचा वापर केल्याने तुम्ही केवळ बचत गटाचे उत्पन्न वाढवण्यास हातभार लावणार नाही तर त्याबरोबर 'आत्मनिर्भर भारत मोहिमेला' चालनाही मिळेल.अशा दुकानांमुळे जीआय उत्पादनांच्या तसेच हस्तकला उत्पादनांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. या मोहिमेमुळे केवळ कारागिरांनाच चालना मिळाली नाही, तर महिलांचे उत्पन्न वाढून त्यांचे सक्षमीकरणही होत आहे.

जागतिक साथरोगाच्या या काळातही आपले स्टार्ट-अप, संपत्ती आणि मूल्य निर्मिती करत राहिले आहेत. भारतीय युनिकॉर्नचा सरासरी वार्षिक वाढीचा दर अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांपेक्षा जास्त आहे.येत्या काही वर्षांत या संख्येत मोठी वाढ होईल, असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपले युनिकॉर्न वैविध्यपूर्ण आहेत
भारताची स्टार्ट-अप यंत्रणा केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही, तर लहाननगरांमधून आणि शहरांमधूनही उद्योजक उदयाला येत आहेत. ई-कॉमर्स, फिन-टेक, एड-टेक, बायो-टेक अशा अनेक क्षेत्रांत ते काम करत आहेत. मला अधिक महत्त्वाची वाटणारी आणखी एक गोष्ट म्हणजे स्टार्ट-अप्सचे जग नव भारताच्या भावना प्रतिबिंबित करणारे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT