Narendra Modi Kiren Rijiju esakal
देश

Indian Constitution : मोदी सरकारची विचारसरणी स्पष्ट आहे, देश संविधानानुसारच चालेल - किरेन रिजिजू

घटनेनुसार काम झालं तर कोणाला बोट दाखवण्याची संधी मिळणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

घटनेनुसार काम झालं तर कोणाला बोट दाखवण्याची संधी मिळणार नाही.

कुरुक्षेत्र : पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आपला देश संविधानानुसारच (Constitution) चालवायचा आहे. कोणी यात बिघडवण्याचा प्रयत्न केला तर देशवासियांना त्याचा विचार करावा लागेल, असं स्पष्ट मत केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी व्यक्त केलं.

पूर्वीच्या सरकारांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीवरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देशात अनेक परिस्थिती निर्माण झाल्या, असंही ते म्हणाले. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या 16 व्या अधिवेशनात ते बोलत होते.

कुरुक्षेत्र विद्यापीठात ते म्हणाले, 'जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक असतात. आपल्याला संविधानाच्या कक्षेत राहून काम केलं पाहिजे. घटनेनुसार काम झालं तर कोणाला बोट दाखवण्याची संधी मिळणार नाही. कोर्टात जी भाषा वापरली जात आहे, ती सोपी करण्यावर आमचा भर आहे. न्यायालयातील युक्तिवाद भारतीय भाषांमध्ये असणं आवश्यक आहे.' तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन केलं. या अधिवेशनात देशभरातील 28 राज्यांतील दोन हजारांहून अधिक वकील सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT