Tamil Nadu Farmer Builds Temple For PM Narendra Modi Team eSakal
देश

PM मोदी आज करणार ३६ हजार कोटींच्या एक्सप्रेस वेची पायाभरणी

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये विकास कामांच्या उद्धाटनांचा धडाका सुरू आहे.

सुधीर काकडे

लखनऊ: केंद्र सरकार (Central Government) आणि राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये सध्या विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरु आहे. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) गेल्या काही दिवसांत अनेकदा उत्तर प्रदेशला गेले आहेत. वाराणसीच्या त्यांच्या दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशाच्या (Uttar Pradesh) शाहजहांपूरमध्ये गंगा दृतगती महामार्गाची पायाभरणी करणार आहेत.

देशभरात दळणवळण वेगवान करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोणातून या दृतगती महामार्गांची निर्मिती केली जात असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. जवळपास ६९४ किमी लांबीचा ६ पदरी महामार्ग तयार करण्यासाठी ३६,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. मेरठमधील बिजौली गावाजवळून सुरू होणारा हा महामार्ग प्रयागराजमधील जुडापूर दांडू गावापर्यंत जातो. मेरठ, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बदाऊन, शाहजहांपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराजला जोडण्याचं काम या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे.

दरम्यान, पश्चिम आणि पुर्व उत्तर प्रदेशला जोडणारा हा उत्तर प्रदेशचा सर्वात मोठा महामार्ग असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : मेटाची जागतिक टीम आणखी काही दिवस भारतात राहणार

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT