pm narendra modi wlecome rafael in india 
देश

नरेंद्र मोदींनी संस्कृत श्लोक ट्विट करत केले राफेलचे स्वागत...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत राफेल फायटर विमानांचे आज (बुधवार) भारतामध्ये लँडिंग झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्कृत श्लोक ट्विट करत राफेलचे स्वागत केले आहे.

अंबाला एअर बेसवर ही विमाने आज दुपारी सुरक्षित उतरली. या फायटर विमानांमुळे भारतीय हवाई दलाचे बळ कित्येक पटीने वाढले आहे. ही विमाने भारतीय भूमीवर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा टि्वट केले आहे. मोदींनी राफेल विमानांच्या स्वागतासंदर्भात संस्कृतमध्ये एक श्लोक टि्वट केला आहे. पंतप्रधानांबरोबरच देशवासीयांनीही राफेलचे जोरदार स्वागत केले आहे. सोशल मीडियावर अनेकजण स्वागताच्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. काँग्रेसने स्वागत करतानाच हवाई दलाच्या जवानांच अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशवासीयांना सरकारला काही प्रश्न विचारण्याचे आवाहनही केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा पक्षी सुरक्षित उतरले असे टि्वट केले आहे.

दरम्यान, २०१६ साली नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार झाला. २०१९ लोकसभा निवडणुकीच्याआधी काँग्रेसने या मुद्दावरुन भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राफेलच्या खरेदी व्यवहारामध्ये भ्रष्टाचार झाला, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. पण न्यायालयाकडून सरकारला क्लीन चीट मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करताच आता लक्ष्मण हाकेंनी दिला इशारा

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT