PM Narendra Modi's private secretary gets an important post in World Bank
PM Narendra Modi's private secretary gets an important post in World Bank 
देश

मोदींच्या खाजगी सचिवांना जागतिक बँकेत मिळाले महत्वाचे पद

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- पंतप्रधानांचे खाजगी सचिव राजीव टोपने यांची वॉशिंग्टन येथील जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकाचे वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. टोपने यांच्याशिवाय ब्रजेंद्र नवनीत यांना जिनेवा, स्वित्झर्लंड येथे जागतिक व्यापार संघटनेत(डब्ल्यूटीओ) राजदूत म्हणून आणि भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली आहे. नवनीत यांनी याआधी प्रधानमंत्री कार्यालयात(पीएमओ) दिर्घकाळ काम केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

राजीव टोपने हे 1996 च्या बॅचचे गुजरात कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील(आयएएस) अधिकारी आहेत. जागतिक बँकेत त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे. तर ब्रजेंद्र नवनीत हे तामिळनाडू कॅडरचे 1999 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी जुलै 2014 ते सप्टेंबर 2019 दरम्यान प्रधानमंत्री कार्यालयात संयुक्त सचिव म्हणून काम केलं आहे. 
----------
पाकिस्तानकडून पुन्हा नापाक कृत्य; भारतीय राजदूतांना धमकावण्याचा प्रयत्न
-----------
कोरोना विषाणू महामारीमुळे जगभरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. टाळेबंदीमुळे भारतावर आर्थिक संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन नियुक्त्या महत्वपूर्ण मानल्या जात आहेत. कारण जागतिक बँक आणि जागतिक व्यापार संघटना व्यापार संबंधी घडामोडींविषयी महत्वपूर्ण भूमिका बजावत आल्या आहेत. देशातील अन्य पाच अधिकाऱ्यांनाही परदेशातील वेगवेगळ्या आर्थिक आणि व्यापार संबंधातील पदांवर नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे देशाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. 

वरिष्ठ आयएएस अधिकारी रवि कोटा यांची वॉशिंग्टन येथे भारतीय दूतावासात मंत्री (आर्थिक) म्हणून नेमणूक झाली आहे. ते आसाम-मेघालय कॅडरचे 1993 च्या बॅचचे अधिकारी आहेत. केंद्रीय सचिवालय सेवा (सीएसएस) अधिकारी लेखन ठक्कर यांची बिजिंग, चीन येथे भारतीय दूतावास समुपदेशक (आर्थिक) म्हणून नियुक्ती झाली आहे. भारतीय सिविल लेखा सेवेचे (आयसीएएस) 2000 च्या बॅचचे अधिकारी एच अथेली यांची फिलिपींसच्या मनीलामध्ये आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकाचे सल्लागार म्हणून नेमणूक झाली आहे. 

अनवर हुसैन शेख यांची डब्ल्यूटीओमध्ये भारताच्या स्थायी मिशनचे समुपदेशक म्हणून नियुक्ती झाली आहे. ते 2000 च्या बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवेतील अधिकारी आहेत. अशोक कुमार यांची ब्रसल्स, बेल्जियम येथे भारतीय दूतावासात सल्लागार (उद्योग आणि अभियांत्रिकी) म्हणून नियुक्ती झाली आहे. ते 2004 च्या बॅचचे मणिपूर कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. नियुक्त झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचा कार्यकाळा हा तीन वर्षांचा असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT