PM Nrendra Modi to visit Germany for G-7 summit Olaf Scholz invitation new delhi sakal
देश

‘जी-७‘ शिखर परिषदेसाठी मोदी जर्मनी दौरा करणार

‘जी-७‘ देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ व २७ जून रोजी जर्मनीला जाणार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘जी-७‘ देशांच्या शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ व २७ जून रोजी जर्मनीला जाणार आहेत. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्या निमंत्रणावरून मोदी सहभागी होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या शिखर परिषदेच्या निमित्ताने मोदी अन्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा देखील करणार आहेत.

यानंतर २८ जूनला ते संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर जाणार असून दिवंगत माजी अध्यक्ष शेख खलिफा बीन जायद अल नाहयान यांना आदरांजली अर्पण करतील, तसेच नवनियुक्त अध्यक्ष शेख मोहम्मद बीन जायद अल नाहयान यांना शुभेच्छा देतील. तत्पूर्वी, भारत, रशिया, चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे संमेलन २३ व २४ जून रोजी होत आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून मोदी व्हर्चुअल माध्यमातून सहभागी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरी, सिंधूदुर्गला झोडपलं; येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह हजेरी लावणार, हवामान विभागाचा इशारा

Kolhapur Gokul Dudh Sangh Election 2026 : आदेश आला रे..! कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू; ठराव दाखल तारीख जाहीर

नितीन देसाई नैराश्यात होते हे माहीत असूनही इंडस्ट्रीने त्यांना मदत का केली नाही? संजय जाधव यांनी सांगितलं कारण

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

Latest Marathi News Live Update : पुणे विभागाकडून 'गणपतीपुळे' आणि 'तुळजापूर-गाणगापूर' विशेष पॅकेज टूर सेवा सुरू

SCROLL FOR NEXT