Shraddha Murder Case aaftab esakal
देश

Shraddha Murder Case: श्रद्धाचं शीर दक्षिण दिल्लीतल्या तलावात फेकलं? पाणी उपसा सुरु

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः प्रेयसीचे ३५ तुकडे करणाऱ्या हैवानाने तिचं शीर एका तलावामध्ये फेकल्याचा संशय आहे. त्यामुळे दिल्लीतल्या मैदान गढी येथील तलावामध्ये असलेलं पाणी उपसलं जात आहे.

श्रध्दा मर्डर केसमध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. आफताबने श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केल्यानंतर ते फ्रिजमध्ये साठवलं होते. सोयीनुसार तो ते तुकडे दिल्लीतल्या महरौली भागात फेकायचा. या सगळ्यामध्ये तिचं शीर त्याने कुठे टाकलं, हे कळत नव्हतं.

सूत्रांच्या माहितीनुसार आफताबने श्रद्धाचं शीर दक्षिण दिल्लीतल्या मैदान गढी यथील तलावात फेकलं. त्यामुळे तातडीने पोलिस तलाव परिसरतामध्ये पोहोचले आहेत. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये तलावातील पाणी उपसलं जातंय. येथेच श्रद्धाचं शीर असल्याचं अंदाज व्यक्त केला जातोय.

श्रद्धा हत्येवेळी गर्भवती होती?

मृत्युवेळी श्रद्धा गरोदर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांना एका माकडहाडाचा मोठा भाग सापडला आहे. हा भाग श्रद्धाच्या मृतदेहाचा असावा, असा अंदाज असून त्याची तपासणी केली जात आहे. दिल्ली पोलिसांना श्रद्धा तिच्या हत्येवेळी गर्भवती असल्याचा संशय आहे. इतक्या वेळानंतर सापडलेल्या हाडांच्या मदतीनं तिची गर्भधारणा निश्चित करणं कठीण आहे.

पोलिसांच्या चौकशीत आफताबनं सांगितलं की, त्यानं आधी तिन्ही फोटोंच्या फ्रेम्स तोडल्या आणि नंतर किचनमध्ये माचीस लावून त्या जाळल्या. आफताबला श्रद्धाशी संबंधित सर्व पुरावे नष्ट करायचे होते. त्यासाठी त्यानं 23 मे रोजी घरातील श्रद्धाचं सामान एका पिशवीत भरलं होतं. आफताबच्या फ्लॅटमधूनही पोलिसांनी एक बॅग जप्त केलीय. त्यात श्रद्धाचे कपडे आणि बूट सापडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: मुलाखती पुढे ढकलणे पात्र उमेदवारांवर अन्याय, मुख्यमंत्र्यांना निवेदन

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT