Police Sakal
देश

पोलिस दलांसाठी २६ हजार कोटी; आधुनिकीकरण योजनेला पाच वर्षे मुदतवाढ

जम्मू-काश्‍मीर, ईशान्य भारत आणि नक्षलवादग्रस्त भागासाठीही होणारा खर्च यात जमेस धरण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पोलिस दलांच्या आधुनिकीकरण योजनेची केंद्र सरकारने आणखी पाच वर्षे वाढविली असून त्यासाठी २६ हजार २७५ कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. जम्मू-काश्‍मीर, ईशान्य भारत आणि नक्षलवादग्रस्त भागासाठीही होणारा खर्च यात जमेस धरण्यात आला आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने आज एका निवेदनाद्वारे याबाबत घोषणा केली. यानुसार, देशभरातील पोलिस दलांच्या आधुनिकीकरणाची योजना आणखी पाच वर्षे, म्हणजे २०२५-२६ सालापर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिस दलांमध्ये आधुनिकीकरणाला वेग येऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत पुढाकार घेतला, असे निवेदनात म्हटले आहे.

त्यासाठी केंद्राने २६,२७५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जम्मू-काश्‍मीर, ईशान्य भारत आणि नक्षलवादग्रस्त भागांमध्ये नव्या तुकड्या उभारणे, न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन करणे आणि तपासासाठी उपयुक्त ठरू शकणारी यंत्रणा उभारणे यासाठीही होणारा खर्चही यातूनच भागवला जाणार आहे. आधुनिकीकरण योजनेअंतर्गत असणाऱ्या सर्व योजनांसाठी ही तरतूद असेल.

गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, अमलीपदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अत्याधुनिक न्यायवैद्यक प्रयोगशाळा उभारण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राज्यांना मदत केली जाणार आहे.

नक्षलवाद केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण आणि कृती आराखडा अमलात आणल्यापासून नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. हा नक्षलवाद समूळ नष्ट करण्याच्या हेतूने सरकारने या संदर्भातील योजनांसाठी ८,६८६ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

अशी असेल निधीची विभागणी (आकडे कोटी रुपयांमध्ये)

१८,८३९

जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा, ईशान्य भारतात घुसखोरी रोखणे आणि नक्षलग्रस्त भागासाठी

४,८४६

राज्य पोलिस दलांच्या आधुनिकीकरण

२,०८०.५०

कोटी न्यायवैद्यक प्रयोगशाळा उभारणीसाठी

३५०

राखीव तुकड्या उभारणी

५०

अमलीपदार्थांच्या तस्करीवर नियंत्रणसाठी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT