Atiq Ahmed esakal
देश

Atiq Ahmed : अतिक अहमदचे मारेकरी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे पोलिसांना मिळाल्या 'या' वस्तू

सकाळ डिजिटल टीम

Atiq Ahmed News : अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळ्या घालणाऱ्या शूटर्सनी १३ एप्रिल रोजी रात्री एका हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. त्या हॉटेलमध्ये पोलिसांना आता काही वस्तू सापडल्या आहेत.

माफीया डॉन अतिक अहमद आणि अशरफ यांची हत्या केल्यानंतर रोज नवनवे खुलासे होत आहेत. तिनही मारेकऱ्यांविषयी पोलिस वेगवेगळी माहिती गोळा करीत आहेत. हे तिनही मारेकरी अतिक आणि अशरफचा दोन दिवस पाठलाग करीत होते.

हेही वाचाः संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

तिनही आरोपी हे प्रयागराज येथील स्टे इन हॉटेलमध्ये रुम नंबर २०३ मध्ये थांबले होते. या तिघांची नावं लवलेश तिवारी, सनी सिंह आणि अरुण मौर्य अशी आहेत.

'आज तक'च्या रिपोर्टनुसार अतिक आणि अशरफला गोळ्या घालणारे शुटर्स १३ एप्रिल रोजी हॉटेलमध्ये आले होते. हे तिघेही अतिकबद्दल संपूर्ण माहिती गोळा करीत होते. त्यांचं मेडिकल चेकअप कधी, कुठे होणार याबद्दल त्यांच्याकडे माहिती होती.

१५ एप्रिल रोजी रात्री प्रयागराज येथील कॉल्विन रुग्णालयाबाहेर मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर या तिघांनी अतिक आणि अशरफ यांची हत्या केली. या घटनेनंतर देशभर राजकारण सुरु झालं. आरोप-प्रत्यरोप सुरु झाले. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरु केली आहे.

अतिक आणि अशरफला गोळी मारणाऱ्या तिन्ही आरोपी ज्या हॉटेलमध्ये होते त्याची एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यामध्ये त्यांना मोबाईल फोन, मोबाईल चार्जर मिळालं. मात्र या मोबाईलमध्ये सीम कार्ड नव्हतं. पोलिस सीडीआरवरुन पुढील तपास करीत आहेत. त्यामुळे लवकरच तिन्ही शुटर्सबद्दल पोलिस मोठा खुलासा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT