Goa Crime News esakal
देश

गोव्यात ब्रिटीश महिलेवर अरंबोल बीचवर बलात्कार, आरोपीला कर्नाटकातून अटक

सकाळ डिजिटल टीम

पतीसोबत गोव्यात आलेल्या पीडित महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केलीय.

उत्तर गोव्यात (Goa) एका 32 वर्षीय व्यक्तीला ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. अरंबोल बीचजवळील (Arambol Beach) प्रसिद्ध 'स्वीट लेक'मध्ये महिलेसोबत बलात्काराची घटना घडल्याची माहिती गोवा पोलिसांनी (Goa Police) सोमवारी दिली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, स्थानिक रहिवासी आरोपी जोएल व्हिन्सेंट डिसूझा यानं 2 जून रोजी महिला समुद्रकिनाऱ्यावर आराम करत असताना तिच्यावर बलात्कार केला.

पतीसोबत गोव्यात आलेल्या पीडित महिलेनं (British Woman) सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गोव्यात परदेशी महिलेवर बलात्काराची ही पहिलीच घटना नाहीय. यापूर्वी 12 मे रोजी भारतात आलेल्या रशियन कुटुंबातील 12 वर्षीय मुलीवर हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती.

वास्तविक, रशियन कुटुंब गोव्यातील अरंबोलमधील एका रिसॉर्टमध्ये थांबलं होतं. मुलीला हॉटेलच्या खोलीत सोडून कुटुंबीय बाजारात गेलं होतं. दरम्यान, खोलीत मुलगी एकटी असल्याचं पाहून रूम बाॅयनं तिच्यावर बलात्कार केला. आरोपीनं आधी तरुणीवर स्विमिंग पूलमध्ये बलात्कार केला. त्यानंतर खोलीत नेऊन पुन्हा हा प्रकार घडवून आणला. याप्रकरणी गोवा पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईतील हरित ऊर्जेच्या पुरवठ्यात वाढ, टाटा पॉवरचा तीन कंपन्यांसोबत करार

UP Government : ​योगी सरकारची मोठी ॲक्शन; समाज कल्याण विभागाचे ४ अधिकारी बडतर्फ, ३ निवृत्त अधिकाऱ्यांच्या पेन्शन कपातीचे आदेश

मूळ ओबीसींनाच तिकीट, भाजपसोबत जायचं नाही; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शरद पवारांनी दिल्या सूचना

School Bus Accident: नंदुरबारमध्ये भीषण अपघात! स्कूल बस दीडशे फूट खोल दरीत कोसळली; १ विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जखमी

सॅनिटरी पॅडमध्ये लपलेलं 'हे' काय आहे? "तुमचं पॅड खरंच स्वच्छ आहे का?" उजेडात दिसलं धक्कादायक सत्य... जगभरात Viral Video

SCROLL FOR NEXT