police 
देश

Social Media Policy : पोलिसांना फेसबुक, इन्स्टाग्राम वापरण्यावर बंदी!

सकाळ डिजिटल टीम

Social Media Policy : ड्युटीवर असताना सोशल मीडियावर वावरणाऱ्या पोलिसांवर यूपीच्या योगी सरकारने कडक कारवाई केली आहे. आता कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना वैयक्तिक वापरासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही. 

ड्युटी संपल्यानंतरही गणवेशात रिल्स बनविण्यास बंदी घालण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणाहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण देखील प्रतिबंधित आहे. योगी सरकारने बुधवारी पोलिसांसाठी नवीन सोशल मीडिया पॉलिसी जारी केली. 

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक डीएस चौहान यांच्या मंजुरीनंतर योगी आदित्यनाथ सरकारने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. ड्युटीवर असताना पोलीस कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया साइटचा वापर करता येणार नाही.

उत्तर प्रदेश पोलिस कर्मचार्‍यांसाठी जारी केलेल्या सोशल मीडिया पॉलिसीनुसार, पोलीस स्टेशन, ऑफिसची तपासणी आणि पोलीस ड्रिल किंवा फायरींग सहभागी होण्याचे लाईव्ह करणे यापुढे शक्य होणार नाही.  

कारवाईशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. असे कोणतेही कृत्य गोपनीयता धोरणाचे उल्लंघन मानले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT