Rape crime against women esakal
देश

मुलीवर बलात्कार प्रकरणात न्याय मागण्यासाठी गेलेल्या आईवर पोलीसाने केला बलात्कार

चौकीच्या प्रभारीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेश मधील कन्नौज पोलिसांचा लाजीरवाना चेहरा लोकांसमोर आला आहे, कन्नौज मध्ये एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्याच्या तपासाची विचारपूस करण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये गेलेल्या पिडीतेच्या आईवर पोलिस कर्मच्याऱ्यांने बलात्कार केला. त्यानंतर कन्नौजच्या एसपींच्या आदेशानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकीच्या प्रभारीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.

ही घटना कन्नौज कोतवाली पोलिस स्टेशनच्या लगतच्या गावातील आहे, येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. या प्रकरणाचा तपास कन्नौज शहरातील कोतवाली भागातील हाजी शरीफ चौकीचे प्रभारी अनुप कुमार मौर्य यांना ही जबाबदारी देण्यात आली होती. मुलीला न्याय मिळवून देण्याच्या आश्वासनाने चौकीच्या प्रभारीने पिडीताच्या आईला सरकारी बंगल्यात बोलवून तिच्यावर बलात्कार केला.

महिलेने तिच्या तक्रारीमध्ये हाजी शरीफ चौकीचे प्रभारी अनूप कुमार मौर्य यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. घटनेची दखल घेत SP अनुपम सिंह यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी सीओ शिव प्रताप सिंह यांना 24 तासांत चौकशी करून अहवाल देण्यास सांगितले होते. सीईओ यांच्या चौकशीत चौकी प्रभारीनेच महिलेवर बलात्कार केल्याचे सिद्ध झाले. याच्या नंतर महिलेची वैद्यकीय चाचणी केली, आणि आरोपी चौकी प्रभारी याची कारागृहात रवानगी करण्यात आली. एसपींनी सांगितल की दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT