police Rakesh Asthana action provocative posts social media new delhi
police Rakesh Asthana action provocative posts social media new delhi  sakal
देश

प्रक्षोभक ‘पोस्ट’ टाकणाऱ्यांना बेड्या; राकेश अस्थाना

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचारप्रकरणी समाजमाध्यमांवर अनेक आक्षेपार्ह मजकूर व्हायरल होत आहे. असा मजकूर किंवा व्हिडिओ टाकणाऱ्यांवर पोलिसांची नजर असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय या प्रकरणातील आरोपींवर करण्यात येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनी दिली. हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत २३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय घटनास्थळाची तपासणी न्यायवैद्यकिय विभागाचे पथक करत आहेत.

परिसरातील सीसीटीव्ही आणि डिजिटल मीडियाने केलेल्या वृत्तांकनाचे व्हिडिओ तपासून या प्रकरणातील धागेदोरे तपासण्यात येत असल्याचे अस्थाना यांनी सांगितले. जहांगीरपुरी हिंसाचाराची आग काही क्षणात इतकी भीषण बनली होती की, काचेच्या बाटल्यांना दगडांनी उत्तर दिले जात होते. रस्त्याच्या दुतर्फा काचेच्या बाटल्या एका बाजूने फेकल्या जात होत्या. त्याचवेळी दुसऱ्या बाजूचे लोक बचावासाठी दगडांचा वापर करत होते. परिसरातील कुशल सिनेमासमोर सी-ब्लॉकमध्ये झोपडपट्टी आहे. येथे राहणारे लोक कचरा उचलून उदरनिर्वाह करतात. त्यामुळेच या परिसरात भंगार स्वरूपात काचेच्या बाटल्यांची भरपूर सामग्री होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हिंसाचार सुरू होताच कुशल चौकात रस्त्यावरील विक्रेते आणि कट्ट्यांनी भरलेल्या बाटल्या फेकल्या गेल्या.

मशीद आणि मंदिराजवळ प्रवेश नाही

घटनास्थळी मशीद आणि मंदिराजवळ विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. त्याअंतर्गत बॅरिकेडिंग करून रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच दुकान उघडण्यास परवानगी नाही. परिसरात जमावबंदीचे वातावरण आहे. कोणत्याही व्यक्तीला मंदिर आणि मशिदीजवळ जाऊ दिले जात नाही. विशेष प्रकरणांमध्ये, लोकांना ओळखपत्र दाखवण्याची परवानगी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT