Javed Akhtar  Team esakal
देश

RSSची तुलना तालिबानशी; जावेद अख्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

विनायक होगाडे

मुंबई: मुलुंड पोलिसांनी गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एका वकिलाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली होती. हे विधान आक्षेपार्ह असल्याचा दावा या वकिलाने तक्रारीत केला असून पोलिसांनी आता त्याबद्दल अख्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले होते जावेद अख्तर?

गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबान विषयी आपले मत व्यक्त केलं होतं. त्यावेळी तालिबानवर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंगदल या संघटनांवर देखील त्यांनी टीका केली होती. तालिबान हे जंगली असून त्यांचे कृत्य निंदनीय आहे. हे बोलताना पुढे ते असेही म्हणाले होते की, आरएसएस(RSS), विश्व हिंदू परिषद(VHP) आणि बजरंग दलाचे जे समर्थन करतात ते सुद्धा तालिबान सारखेच आहेत. राज्यसभेचे माजी खासदार असलेल्या जावेद अख्तर यांनी देशातील एक मुस्लिम समुह देखील तालिबानचे समर्थन करतोय, असं विधान एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं.

पुढे ते म्हणाले होते की, तालिबान आणि तालिबानसारखे बनण्याची ईच्छा ठेवणारे सारखेच आहेत. देशातील काही मुस्लिम समाजातील एक गट तालिबानचे स्वागत करतोय, असं म्हणत तालिबानचं समर्थन करणाऱ्या लोकांवर त्यांनी टीका केली होती. जगभरातील उजव्या विचारसरणीचे लोक सारखेच आहेत. भारतात जमावाकडून होणाऱ्य़ा मारहाणीच्या घटनांबद्दल बोलताना अख्तर म्हणाले की, या घटना म्हणजे तालिबान बनण्याची फुल ड्रेस रिहर्सल आहे. हे लोक तालिबानच्या कृत्यांना स्विकारता आहे. हे सर्व एकच आहेत, फक्त नावाचा फरक आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले होते की, आरएसअस, विश्व हिंदु परिषद, बजरंग दलासारख्या संघटनांचे जे लोक समर्थन करतात, त्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नक्कीच तालिबान हे मध्ययुगीन मानसिकतेचे समर्थन करणारं संघटन आहे, मात्र आपण ज्या लोकांना समर्थन करताय ते त्यापेक्षा वेगळे आहेत का? या लोकांची मानसिता तालिबान सारखीच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT