Loni man was thrashed
Loni man was thrashed 
देश

गाझीयाबाद प्रकरण; ट्विटरसह काँग्रेसच्या 2 नेत्यांविरोधात FIR

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील लोनीमध्ये एका वयस्कर मुस्लिम व्यक्तीला जोरदार मारहाण केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी 9 लोकांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यात दोन काँग्रेस नेता आणि ट्विटर इंडियाचा समावेश आहे. लोनीच्या घटनेला चुकीच्या पद्धतीने धार्मिक रंग देण्यात आल्याचा दावा करत पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपींनी या वयस्कर व्यक्तीला मारहाण करत त्याची दाढी देखील कापल्याचा व्हिडिओ व्हायरल केला जात होता. (Police registered FIR against Twitter and seven other people incident in Loni man beard chopped off)

लोनीतील या घटनेने राजकीय वळन घेतल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. राहुल गांधींनी या घटनेवरुन सरकारवर टीका केली होती. दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं. एफआयआरमध्ये गाझियाबाद पोलिसांनी म्हटलंय की, लोनीमध्ये झालेल्या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्यात एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली आणि त्याची दाढी कापण्यात आली.

लोनीतील घटनेला कसलीही धार्मिक बाजू नाही. द वायर, राणा अय्युब, मोहम्मद जुबैर, डॉ. शमा मोहम्मद, सबा नकवी, मस्कूर उस्मानी, स्लैमन निजामी यांनी तत्थांची खात्री न करता घटनेला धार्मिक रंग दिला. यासंबंधी ट्विट करुन वातावरण गढूळ करण्याचा आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. धार्मिक गटांमध्ये मतभेद निर्माण केला. ट्विटरने व्हिडिओ व्हायरल होणे थांबण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही, असं पोलिसांनी म्हटलंय.

पोलिसांनी ज्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यात राणा अय्युब आणि नकवी या वरिष्ठ पत्रकारांचा समावेश आहे. मोहम्मद जुबैर फॅक्ट चेकिंग वेबसाईट अल्ट न्यूजचे लेखक आहेत. डॉ. शमा मोहम्मद आणि निजामी काँग्रेस सदस्य आहेत. टीव्ही चर्चांमध्ये ते पक्षाचा एक प्रमुख चेहरा आहेत. अलीगड मुस्लिम यूनिव्हर्सिटी (एएमयू) विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष उस्मानी यांना काँग्रेसने मागील वर्षी बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून संधी दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT