Congress 
देश

Congress: काँग्रेसमध्ये पुन्हा राजकीय भूकंप? बड्या नेत्याच्या मुलाने बदललं X प्रोफाईल, भाजपमध्ये करणार प्रवेश?

काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहेत. नुकतेच काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यातच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलण्याची दाट शक्यता आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसताना दिसत आहेत. नुकतेच काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. त्यातच काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलण्याची दाट शक्यता आहे. कारणही तसंच आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेता कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ यांनी काँग्रेस पार्टीचे नाव आपल्या एक्स प्रोफाईलवरुन काढले आहे.

कमलनाथ आणि त्यांचे खासदार पुत्र हे छिंदवाडाच्या पाच दिवसांचा दौरा करणार होते. पण, त्यांनी तो रद्द करुन अचानक दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज दोघे दिल्ली दौऱ्यावर आहेत. कमलनाथ आणि नकुलनाथ काँग्रेस सोडतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्यासोबत १० ते १२ आमदार असल्याचंही सांगितलं जातं. मात्र, याबाबत अधिकृत कोणतीही माहिती नाही. त्यांनी पक्ष सोडला तरी कोणत्या पक्षात प्रवेश करतील याबाबत प्रश्न कायम आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील काँग्रेसचे मोठे नेते मिलिंद देवरा यांनी पक्ष सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हाती घेतले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. या दोन्ही नेत्यांना राज्यसभेची संधी मिळाली आहे.

दिग्विजय सिंहांचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर हल्लाबोल केला. ज्यांना भीती वाटत आहे तेच लोक जात आहेत. कमलनाथ यांच्याशी माझं कालच बोललं झालं आहे. ते छिंदवाडामध्ये आहेत. ते कधीही भाजपमध्ये जाणार नाहीत. ज्या व्यक्तीने नेहरु कुटुंबियांसोबत काम केलं आहे. तो व्यक्ती असं करु शकत नाही, असं ते म्हणाले.

लोकसभा निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याआधी भाजपमध्ये इनकमिंग सुरु झालीये, तर अनेक बडे नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत. भाजपने लोकसभा निवडणूक लढण्यासाठी कंबर कसली असून साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर केला जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT