Rana-Raut Leh Visit e sakal
देश

राजकीय विरोधकांचा लेह दौरा, राणा-राऊतांमध्ये रंगल्या गप्पा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : संसदेतील परराष्ट्र व्यवहार समितीकडून लेहमध्ये अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विरोधकांवर तुटून पडणारे संजय राऊत आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे राणा दाम्पत्य (Rana-Raut Leh Visit) सध्या एकाचवेळी लेह दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचे काही व्हिडिओ समोर आले असून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राणा आणि संजय राऊत एकाच पंगतीत बसलेले दिसतात. तसेच दोघंही एकमेकांसोबत चर्चा करताना देखील दिसत आहेत.

राणा दाम्पत्य शिवसेनेवर वारंवार आरोप करतात. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा वाचणार असल्याचं राणा दाम्पत्यांनी सांगितलं होतं. त्यासाठी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दोघेही मुंबईला पोहोचले होते. पण, शिवसैनिकांनी त्यांना रोखण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दोघांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांनी तब्बल १३ दिवस कोठडीत काढले होते. कोठडीतून सुटका झाल्यानंतर राणा दाम्पत्याने शिवसेनेवर आरोप केले होते. आम्हाला कोठडीत वाईट वागणूक दिल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यावेळी राऊतांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा नौटंकी करतात असे आरोप केले होते. तसेच दोघांचा उल्लेख ''बंटी-बबली'' असा केला होता. नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार देखील केली होती.

राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तक्रार करण्यासाठी थेट दिल्ली गाठली होती. त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना भेटून आम्हाला तुरुंगात वाईट वागणूक दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र संसदीय समितीच्या अभ्यास दौऱ्यासाठी राणा दाम्पत्य लेहकडे रवाना झाले. विशेष म्हणजे या दौऱ्यात खासदार संजय राऊत देखील आहे. या वादाचा परिणाम लेह दौऱ्यावर होणार का? असा प्रश्न होता. पण, संजय राऊत आणि आमदार रवी राणा यांच्यामध्ये चांगल्या गप्पागोष्टी रंगल्याचे दिसतेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

Uruli Kanchan Firing Case : बारा दिवस उलटूनही गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास नाहीच? तपासावर प्रश्न चिन्ह

Latest Marathi News Update : मुंबई पोलिसांची रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहीम; ३६ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

SCROLL FOR NEXT