political parties income and expenditure election commission annual report bjp congress cpi and others  esakal
देश

BJP Income : भाजप निधी उभारणीत नंबर वन; एका वर्षात मिळाले 'इतके' कोटी, तर काँग्रेसला…

सकाळ डिजिटल टीम

सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून निधी उभारण्यात आघाडीवर आहे. हा पक्ष दरवर्षी इतर राजकीय पक्षांपेक्षा खूप जास्त पैसा उभा करत आहे. गेल्या 7 वर्षांपासून भाजप निधी उभारणीत आघाडीवर असून 2021-22 या आर्थिक वर्षात भाजपला विविध ठिकाणहून एकूण 1,917.12 कोटी रुपये मिळाले.

निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे. पक्षाच्या ऑडिट रिपोर्टनुसार, भारतीय जनता पक्षाला (भाजप) 2021-22 या आर्थिक वर्षात विविध ठिकाणहून एकूण 1,917.12 कोटी रुपयांचा निधी मिळाला. ज्यामध्ये पक्षाला इलेक्टोरल बाँड्सद्वारे 1,033.7 कोटी रुपयांचे योगदान मिळाले. ज्यापैकी पक्षाने 854.46 कोटी रुपये खर्च केले.

भाजपने काँग्रेसला टाकलं मागे

देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष काँग्रेसने आर्थिक वर्ष 2021-22 च्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये आपला खर्च 400.41 कोटी रुपये आणि मिळकत 541.27 कोटी रुपये दाखवली आहे. काँग्रेसने 347.99 कोटी रुपयांचे अनुदान, देणगी आणि योगदान दाखवले आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी (BJP) तुलना केली तर काँग्रेस या बाबतीत खूपच मागे पडली आहे.

सीपीआयला मिळाले 2.87 कोटी

भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) ने आर्थिक वर्ष 2021-22 च्या वार्षिक ऑडिट रिपोर्टमध्ये 2.87 कोटी रुपये ठेवी आणि 1.18 कोटी रुपये खर्च दाखवला आहे. सीपीआय देशभरातील अनेक राज्यांमध्ये निवडणुका लढवते. मात्र पक्ष सध्या कोणत्याही मोठ्या राज्यात सत्तेत नाहीये.

निवडणूक आयोगाने मंगळवारी राजकीय पक्षांशी संबंधित उत्पन्न आणि खर्चाचा वार्षिक अहवाल सार्वजनिक केला आहे. ज्यामध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) आणि काँग्रेस, हे तिघे देशातील 8 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांपैकी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT