shivraj singh chauhan 
देश

MP election : राजकीयदृष्ट्या मी गोंधळलोय, मला मार्ग दाखवा; शिवराज सिंह चौहान यांची साधूंना विनंती

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अनेक संभाव्य चेहऱ्यांना पुढं केलं आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी रात्री साधूंकडे आशीर्वाद मागितले. तसेच मी भरकटलो, मला मार्ग दाखवा अशी विनंती केली आहे.

शिवराज सिंह चौहान म्हणाले की, मी साधूंना विनंती करतोय की मला मार्गदर्शन करा. मला योग्य मार्गावर जाण्यास मदत करा, कारण राजकीयदृष्ट्या गोंधळलो आहे. प्रत्येक पायरीवर पाय घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. मी थोडा चुकलो की, अनेकजण मला आणखी अडचणीत आणण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे योग्य मार्गाने पुढं जाण्यासाठी मला आशीर्वाद हवेत, असंही चौहान यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री चौहान यांनी उज्जैनमधील 'महाकाल लोक'च्या दुसऱ्या टप्प्याच्या 242.3 कोटी रुपयांचे कामाचे लोकार्पण केले. तसेच २४२ कोटींच्या युनिटी मॉल आणि मेडीकल कॉलेजच्या कामाचे भूमीपुजन केलं. यावेळी त्यांनी व्यासपीठावरील साधूंकडे आशीर्वाद मागितले.

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मध्यप्रदेश जिंकण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी केंद्रीय नेतृत्व कठोर निर्णय घेत अनेक दिग्गजांना डच्चू देण्याची शक्यता आहे. त्यामुळे चौहान यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल की, नाही, यावर देखील शंका उपस्थित करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT