politics of polarization must be stopped Sitaram Yechury sakal
देश

ध्रुवीकरणाचे राजकारण रोखावे लागेल : सीताराम येचुरी

हिंदुत्वाच्या जातीयवादी धार्मिक अजेंड्याला थेट शह देण्याची वेळ आली असून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न प्रत्येक पातळीवर हाणून पाडावा लागेल.

सकाळ वृत्तसेवा

कन्नूर : हिंदुत्वाच्या जातीयवादी धार्मिक अजेंड्याला थेट शह देण्याची वेळ आली असून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न प्रत्येक पातळीवर हाणून पाडावा लागेल. डाव्या पक्षांसमोर सध्या हिंदीभाषक राज्यामध्ये जातीय- धार्मिक ध्रुवीकरणाचे फार मोठे आव्हान उभे ठाकले असल्याचे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकप) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी मांडले आहे.

‘माकप’च्या सरचिटणीसपदी येचुरी यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली असून त्या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे मत मांडले. उत्तरेप्रमाणेच ईशान्येकडील राज्यांमध्ये झपाट्याने हे धार्मिक आणि जातीयवादाचे विष भिनू लागले असून याचे भविष्यामध्ये गंभीर परिणाम भोगावे लागणार असल्याचे भीतीही त्यांनी व्यक्त केली.

नको असलेले मुद्दे चर्चेत

ध्रुवीकरणाच्या राजकारणामध्ये लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न बाजूला पडत असल्याची खंत व्यक्त करतानाच येचुरी यांनी हिजाब, हलाल आणि अजान हे नको असलेले मुद्दे चर्चेमध्ये येत असल्याची खंत व्यक्त केली. वाढती महागाई, बेरोजगारी या समस्यांवर कुणीच बोलत नाही. इंधानाच्या किमतीही आकाशाला भिडल्या आहेत. हे सगळेच मुद्दे ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे अडगळीत पडले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

SCROLL FOR NEXT