Kannada Actor Kiccha Sudeep esakal
देश

Karnataka Election : कर्नाटक निवडणुकीत 'हा' बडा सुपरस्टार बदलणार भाजपचं 'नशीब'?

या सुपरस्टारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय.

Balkrishna Madhale

नायक समाजातील तरुण पिढी आणि ज्येष्ठांना आपल्याकडं आकर्षित करण्याचा करिष्मा सुदीपकडं आहे, हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या (BJP) प्रचारात कन्नड अभिनेता किच्चा सुदीप (Kannada Actor Kiccha Sudeep) उतरल्यामुळं विरोधी गटात खळबळ उडालीये.

या सुपरस्टारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय. यासोबतच अभिनेता किच्चा सुदीपनं सांगितलं की, माझ्या संघर्षाच्या काळात बोम्मई पाठीशी उभी राहिले, त्यामुळं त्यांना पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य समजतो. बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हे माझ्या मामासारखे आहेत, असंही त्यानं स्पष्ट केलं.

'किच्चा'चा भाजपला फायदा होणार?

  • किच्चा सुदीपच्या प्रवेशाचा भाजपला सर्वात मोठा फायदा म्हणजे, कर्नाटकात अभिनेत्याचे सर्वाधिक चाहते आहेत. त्याच्या निवडणूक प्रचारामुळं भाजपला सरकारनं केलेली विकासकामं लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे.

  • किच्चा सुदीपचं भाजपच्या कॅम्पमध्ये सामील होणं ही मुळात एक धोरणात्मक चाल आहे. कारण, हा अभिनेता नायक समाजाचा आहे. राज्यात या समाजाची 7 टक्के लोकसंख्या आहे. अशा स्थितीत नायक समाजाची मतंही भाजपच्या गोटात पडणार आहेत.

  • नायक समाजातील तरुण पिढी आणि ज्येष्ठांना आपल्याकडं आकर्षित करण्याचा करिष्मा सुदीपकडं आहे, हे भाजपला चांगलंच ठाऊक आहे. हा नायक समुदाय बळ्ळारी, रायचूर, कोप्पळ, गदग आणि चित्रदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात आहे.

  • अभिनेते उमेदवारांचा प्रचार करतात. पण, पक्षात सामील होत नाहीत हा कर्नाटकात ट्रेंड आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सुदीपनं मोलाकलमुरू विधानसभा मतदारसंघात श्रीरामुलूंसाठी प्रचार केला होता. किच्चा शिवमोग्गा जिल्ह्यातील आहे. त्याला तेथील लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे.

किच्चाची फिल्मी कारकीर्द

दोन दशकांच्या कारकिर्दीत सुदीपनं कन्नड, हिंदी, तेलगू आणि तमिळ भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलंय. 'स्वाथी मुथु', 'केम्पे गौडा', 'ईगा' आणि 'पैलवान' यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी तो ओळखला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता १६ तासांचा प्रवास फक्त ८ तासांत! विदर्भ समुद्री मार्गाने मुंबईशी जोडला जाणार; पर्यटन आणि व्यवसायाला चालना मिळणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Jalgaon Sports Complex : जळगाव जिल्हा क्रीडासंकुलाला ऑलिंपिक टच! खानदेशातला पहिला अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक साकारणार

D Mart Barcode Scam : डी मार्टच्या बारकोडमध्ये स्कॅम करायचा, कंपनीतील कर्मचाऱ्याने लावलं होतं कामाला...; पण एक चूक पडली महागात

Video: ट्रॅक्टरवर वाजलं 'चुनरी-चुनरी' गाणं.. फॉरेनरसुद्धा थिरकल्या; व्हिडीओ तुफान व्हायरल

Latest Marathi Breaking News : पंढरपूरमध्ये तीन दुकानांना मोठी आग

SCROLL FOR NEXT