Indian Army esakal
देश

Jammu Kashmir : जवानांमध्ये वादातून गोळीबार; दोन ठार, तर दोघे जखमी

पूंछ जिल्ह्यातील सुरनकोटमधून एक मोठी घटना समोर आलीय.

सकाळ डिजिटल टीम

पूंछ जिल्ह्यातील सुरनकोटमधून एक मोठी घटना समोर आलीय.

पूंछ : पूंछ जिल्ह्यातील (Poonch District) सुरनकोटमधून एक मोठी घटना समोर आलीय. सुरनकोटमध्ये सीमेची सुरक्षा सांभाळणाऱ्या लष्कराच्या (Indian Army) बटालियनमध्ये तैनात असलेल्या जवानांमध्ये वाद झाला, त्यानंतर गोळीबारही झालाय. या घटनेत लष्कराचे दोन जवान शहीद झाले, तर दोन जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

सुरनकोट पोलिसांनीही (Surankote Police) याला दुजोरा दिला असून, या वादामागील कारण अद्याप समजू शकलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांचं पथक घटनास्थळी रवाना झालं आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडल्याचं सूत्रांनी सांगितलं. टेरिटोरियल बटालियनच्या या जवानांची सकाळी सहा वाजता परेड होणार होती, असंही सांगण्यात येतंय. त्याआधी सैनिकांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला होता. प्रकरण इतकं वाढलं की सैनिकांमध्ये हाणामारी झाली.

दरम्यान, परेडसाठी देण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर करून काही जवानांनी एकमेकांवर गोळीबार सुरू केला. यामध्ये दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जवान गंभीर जखमी झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून बटालियनमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं. दरम्यान, काही सैनिक रक्ताने माखलेले जमिनीवर पडले होते. या सर्वांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं, तर दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफाही तिथं पोहोचला आहे. सैनिकांमध्ये वाद कशामुळं सुरू झाला हे समजू शकलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT