Rahul Gandhi sakal
देश

Rahul Gandhi : पुरासाठी ढिसाळ व्यवस्थापन जबाबदार;राहुल गांधी यांनी घेतली पूरग्रस्त नागरिकांची भेट

महापुरामुळे आसामचे कधी न भरून येणारे नुकसान झाले असून केंद्र सरकारने तातडीने भरीव मदत करावी, अशी मागणी आज काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

सिल्चर : महापुरामुळे आसामचे कधी न भरून येणारे नुकसान झाले असून केंद्र सरकारने तातडीने भरीव मदत करावी, अशी मागणी आज काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केली. डबल इंजिन सरकारच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे महापुराची तीव्रता वाढली आणि त्याचा फटका नागरिकांना बसला, असा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी यांनी आज पूरग्रस्त आसामचा दौरा केला. लखीपूरच्या फुलेरताल येथे पुरग्रस्तांसाठीच्या मदत छावणीला भेट दिली.

आसामच्या पूरग्रस्त भागातील नागरिकांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. पुरामुळे आसामचे प्रचंड नुकसान झाले, असे राहुल यांनी नमूद केले. आसामच्या पूरग्रस्त नागरिकांना आणि भागाला भरीव निधीची गरज आहे. ईशान्येकडील पाणी व्यवस्थापन प्राधिकरणाने पूरग्रस्त पाण्यावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्याची गरज आहे. या पुरात निष्पाप मुलांचे जीव गेले. अविनाश नावाचा आठ वर्षाचा मुलगा वाहून गेला. ते आणि त्याचे वडील गुवाहाटी येथे स्कूटरवरून जात असताना मॅनहोलमध्ये पडले. त्याचे वडील वाचले, परंतु चार किलोमीटर अंतरावर मुलाचा मृतदेह सापडला. यात व्यवस्थापन दोषी आहे.

आसामच्या पुराचा २४ लाख लोकांना फटका बसला असून ५३ हजाराहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. आसामचा महापूर हा खोटी आश्‍वासने देत सत्तेवर आलेल्या भाजपच्या डबल इंजिन सरकारचे अपयश असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. भाजपने पूरमुक्त आसामची घोषणा देत सत्ता मिळवली, मात्र पूरग्रस्तांची आकडेवारी ही भाजप सरकारच्या प्रशासनातील गंभीर चुका दाखविणारी आहे, याकडे राहुल यांनी लक्ष वेधले. भूस्खलन, महापूर आणि चक्रीवादळामुळे आतापर्यंत ७८ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ६६ जण केवळ महापुरामुळे गेले.

बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओेलांडली आहे. आसामला लवकरात लवकर मदत, पुनर्वसन आणि मोबदला देण्याची गरज आहे. तसेच एक व्यापक दृष्टीची देखील आवश्‍यकता आहे. मी खासदार असून मी त्यांचा सैनिक आहे. केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मदत देण्यासाठी प्रयत्न करेन आणि त्यासाठी सरकारकडे आग्रह करेल, असे राहुल गांधी म्हणाले. त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी मदत छावण्यात सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT