Arvind Kejriwal 
देश

Election Results : दिल्लीत 'कहाँ गए आप?'; सातपैकी शून्य जागा!

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी मोठ्या मताधिक्‍याने ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या 'आम आदमी पार्टी'ला (आप) त्यांच्याच राज्यात लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीतील सातपैकी एकाही जागेवर 'आप'ला विजय मिळविता आलेला नाही. दिल्लीतीत सर्व सातही जागांवर भाजपच आघाडीवर आहे. 

विशेष म्हणजे, सातपैकी केवळ दोनच जागांवर 'आप'चे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अन्यथा, दिल्लीतील मुख्य चुरस भाजप आणि कॉंग्रेसमध्येच आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने राजकीय पदार्पणातच विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्याने कॉंग्रेसच्या अरविंदरसिंग लव्हली यांच्यावर अडीच लाखांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. दिल्लीमध्ये सर्वांत कमी आघाडी केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांना मिळाली आहे. हर्ष वर्धन यांना 89 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. 

दिल्लीतील जागा जिंकून पुन्हा एकदा आव्हानवीर ठरण्याच्या 'आप'च्या स्वप्नाला यंदा जोरदार धक्का बसला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT