crime news sakal
देश

Crime: अल्पवयीन मुलाचे निर्घृण कृत्य! पॉर्न पाहून बलात्कार अन् मग दहा वर्षाच्या मुलीची हत्या

अल्पवयीन तरुणांने पॉर्न पाहून शेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय मुलीवर बलात्कार करून गळा दाबुन केला खून केला

सकाळ डिजिटल टीम

छत्तीसगडमधील बेमेटारा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय तरुण तासनतास पॉर्न पाहून त्यानंतर शेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबुन खून केला आहे. आई-वडील कामावर असताना त्याने हा गुन्हा केला आहे. आरोपीने पीडितेच्या घरात छतावरून प्रवेश केला होता. मुलीची हत्या केल्यानंतर तिला बांबूला लटकवण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. यातून तो बलात्काराच्या घटनेला आत्महत्येसारखे भासवण्याचा प्रयत्न करत होता. या चिमुरडीला गाठ बांधण्यासाठी एवढी उंची गाठता आली नसती यामुळे या मुलाचा डाव पोलिसांना लगेच समजला.

रायपूरपासून 90 किमी अंतरावर असलेल्या गावात २६ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली आहे. आरोपीला सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्याची रवानगी दुर्ग जिल्ह्यातील रिमांड होममध्ये रवानगीही करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामावरून परतल्यावर आई-वडिलांना या भीषण घटनेची माहिती मिळाली. हादरलेल्या कुटुंबाने स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्याला चौकशीसाठी आणले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्याचा कट रचल्याचे त्याने आपल्या जबाबात मान्य केल्याचे माहिती समोर आली आहे. पीडित तरुणी आपले नाव पोलिसांना सांगेल, अशी भीती त्याला वाटत होती. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने स्वत:च्या काठीने तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली आणि त्यानंतर मृतदेह लटकवला. खेळताना चुकून तिने गळफास घेतला असे भासवण्यासाठी त्याने मुलीच्या शरीराशेजारी एक खुर्ची व्यवस्थित ठेवली.

पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी तिच्या एका वर्षाच्या भावाची काळजी घेत होती. तिची हत्या केल्यानंतर आरोपीने मुलाला जमिनीवर झोपवले जेणेकरून शेजाऱ्यांना त्याचे रडणे ऐकू येईल.

दरम्यान, तरुणाने कबूल केले की, आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, त्याला पॉर्नचे व्यसन आहे. बलात्कार आणि हत्येपूर्वी त्याने पॉर्न पाहिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मेट्रो-इंटरनेट सुरू करा, बॅरिकेड्स हटवा; कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईपर्यंत...; सुप्रीम कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

CJP आंदोलनाचा व्यापाऱ्यांना फटका, २ हजार कोटींचं नुकसान; व्यवसाय ठप्प, CTIने केली 'ही' मागणी

Maharashtra Live News : रायगडमध्ये पावणेचार लाखाहून मतदार अडचणीत

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

Rice Smuggling: रेशनचा पाच लाख किलो तांदूळ जप्त, २४ ट्रकसह ४.७५ कोटींचा मुद्देमाल ताब्यात; नऊ जणांवर गुन्हे, दोन अधिकारी निलंबित

SCROLL FOR NEXT