Political News sakal
देश

Political News : केंद्रीय मंत्रिमंडळ समित्यांत घटक पक्षांना स्थान

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा आज करण्यात आली. ‘एनडीए’तील घटक पक्ष संयुक्त जनता दल, तेलुगू देसम, धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि शिवसेना या पक्षांना मंत्रिमंडळ समित्यांमध्ये सामावून घेण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा आज करण्यात आली. ‘एनडीए’तील घटक पक्ष संयुक्त जनता दल, तेलुगू देसम, धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आणि शिवसेना या पक्षांना मंत्रिमंडळ समित्यांमध्ये सामावून घेण्यात आले. तर, सरकारी नियुक्त्यांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मंत्रिमंडळ समितीसह सर्व आठही समित्यांमध्ये समावेश असलेले गृहमंत्री अमित शहा हे एकमेव मंत्री आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सहा तर परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचा चार समित्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

नियुक्ती समिती, निवास व्यवस्था समिती, आर्थिक व्यवहार समिती, संसदीय व्यवहार समिती, राजकीय व्यवहार समिती, सुरक्षा समिती, गुंतवणूक आणि विकास समिती, कौशल्य रोजगार आणि उपजिविका समिती अशा आठ मंत्रिमंडळ समित्यांची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली.

शासकीय निवासस्थानांचे वाटप करणाऱ्या निवास व्यवस्था समिती व संसदीय व्यवहार समिती व्यतिरिक्त उर्वरित सर्व समित्यांच्या अध्यक्षपदी पंतप्रधान मोदी असतील. तर निवास व्यवस्था समितीचे नेतृत्व गृहमंत्री अमित शहा आणि संसदीय व्यवहार समितीचे नेतृत्व संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्याकडे असेल. सैन्यदलांच्या तिन्ही प्रमुखांच्या नियुक्तीसह रिझर्व्ह बॅंक, महाधिवक्ता, सचिव आणि सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसोबतच सरकारच्या महत्त्वाच्या पदांवरील नियुक्तीचे अधिकार असलेल्या नियुक्ती समितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांचाच समावेश करण्यात आला.

  • सुरक्षा विषयक समिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री

  • एस. जयशंकर

  • निवासस्थान व्यवस्थापन समिती : अमित शहा, नितीन गडकरी,

  • निर्मला सीतारामन, मनोहरलाल खट्टर, पीयुष गोयल

  • विशेष निमंत्रक : डॉ. जितेंद्र सिंह

  • आर्थिक व्यवहार विषयक समिती: एच. डी. कुमारस्वामी, राजीव रंजन

  • उर्फ लल्लन सिंह

  • संसदीय व्यवहार समिती : राजीव रंजन उर्फ लल्लन सिंह, के. राममोहन नायडू.

  • व्यवहार विषयक समिती : के. राममोहन नायडू, जितनराम मांझी

  • गुंतवणूक आणि विकास समिती : चिराग पासवान

  • विशेष निमंत्रक : प्रतापराव जाधव

  • कौशल्य रोजगार व उपजिविका समितीचे विशेष निमंत्रित : जयंत चौधरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Festival 2025 : केज पोलिसांची डीजे विरोधात कारवाई; गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पारंपारिक वाद्यांचा आग्रह

"आठ महिने तिने आम्हाला भेटणं टाळलं" प्रिया मराठेच्या अखेरच्या दिवसांबद्दल मैत्रीण झाली व्यक्त; म्हणाली..

Ganpati Visarjan 2025 Live Updates : .लासलगावला अभूतपूर्व उत्साहात गणेश विसर्जन

९० वर्षांची परंपरा आजही कायम! बैलगाडीतून निघालेली गणपती मिरवणूक ठरली खास, भाविकांसाठी अविस्मरणीय अनुभव

Latest Maharashtra News Updates : 'बिडी-बिहार' वादात केरळ काँग्रेसने आपली चूक मान्य केली

SCROLL FOR NEXT