mis-c children Google file photo
देश

केरळवर नवं संकट; पोस्ट-कोविड कॉम्पलीकेशनमुळे 4 मुलांचा मृत्यू

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. अशात केरळवर आणखी एक संकट आलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या पाच महिन्यांमध्ये केरळमध्ये जवळपास 300 पेक्षा अधिक मुलांमध्ये मल्टी-सिस्टम इंफ्लेमेटरी सिंड्रोम-इन चिल्ड्रन (MIS-C) म्हणजेच पोस्ट कोविड कॉम्पलीकेशन आढळून आले आहेत. यातील चार मुलांचा मृत्यू झाला आहे. MIS-C मुळे केरळच्या चिंतेत वाढ झाली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आई-वडिलांना आपल्या मुलामध्ये MIS-C चे लक्षणं आढळून आल्यास तत्काळ उपचार घेण्यास सांगितलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, यावर उपचार शक्य आहेत. पण याकडे दुर्लक्ष केल्यास समस्या निर्माण होऊ शकतात.

MIS-C ची लक्षणं काय?

तज्त्रांनी सांगितलंय की, कोरोनाच्या संक्रमणातून बरे झाल्यानंतर लहान मुलांमध्ये तीन ते चार आठवड्यांनी ताप, पोटात दुखणे, डोळे लाल होणे आणि मळमळ अशा काही समस्या जाणवू शकतात. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये 10 टक्के लोक हे 18 वर्ष वयोगटातील आहेत, तर MIS-C चे लागण 15 वर्ष वयापेक्षा कमी मुलांना झाली आहे. MIS-C चा पहिला रुग्ण मार्च महिन्यात तिरुवनंतपुरमच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नोंद झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत 300 पेक्षा अधिल मुलांमध्ये याची लक्षणं आढळून आली आहेत.

केरळमधील स्थिती चिंताजनक

केरळमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. राज्यात गेल्या चार दिवसांपासून 30 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. स्थिती इतकी गंभीर आहे की, फक्त पाच दिवसांमध्ये केरळमध्ये कोरोनाचे जवळपास दीड लाख रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. केरळमध्ये वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील रुग्णसंख्या 45 हजारांच्या पुढे आढळून येत आहे. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा शुक्रवारी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT