Lakhimpur Uttar Pradesh Team eSakal
देश

लखीमपूरमध्ये गोळीबार नाही, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे

उत्तरप प्रदेशच्या लखीमपूर- खेरी या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात गोळीबार न झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

ओमकार वाबळे

यूपीच्या लखीमपूर खेरीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला होता. देशभरात या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहेत. आता यासंदर्भात शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे.

मरण पावलेल्या चार शेतकऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये शेकऱ्यांचा मृत्यू शॉक लागून तसेच अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. लखीमपूर येथे शेतकरी आंदोलन सुरू असताना हिंसाचार झाला होता. यामध्ये चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर चार सरकारी कर्मचारी देखील मृत्यू पावले. या प्रकरणानंतर योगी सरकारवर देशभरातून टीका होत आहे. विविध माध्यमांवर लोक तीव्र असंतोष व्यक्त करत आहेत. आता शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर महत्वाचे खुलासे झाले आहेत.

तिकुनिया-बनबीरपूर रस्त्यावर वाहनांनी आंदोलकांना चिरडल्याने नक्षत्रसिंग, दलजीत सिंग, लव्हप्रीत सिंग आणि गुरविंदर सिंग अशी ओळख असलेल्या चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा शेतकरी संघटनेने केला आहे.

शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे की, 18 वर्षीय शेतकरी लव्हप्रीत साईचा फरफटल्याने मृत्यू झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. यामध्ये रक्तस्त्रावाचा उल्लेख आहे. गुरविंदरसिंगच्या शरीरावर धारदार वस्तूंनी जखमा झाल्याचे आणि त्याचा मृत्यू देखील शॉक आणि रक्तस्त्रावामुळे झाल्याचे अहवालातून समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर, नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेला 'सर्वोच्च' दणका! कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

Latest Marathi News Live Update : अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ग्रामस्थांचा मूक मोर्चा

SCROLL FOR NEXT