AAP Vs BJP 
देश

AAP Vs BJP: भाजपच्या फिल्मी पोस्टरबाजीनंतर आपचं जोरदार प्रत्युत्तर; पाहा काय आहे प्रकार?

दिल्लीच्या महापालिकेत झालेल्या राड्यावरुन भाजपनं एक पोस्टर तयार केलं होतं त्याला आता आपनं भाजप नेत्यांचं पोस्टर बनवून उत्तर दिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीच्या महापालिकेत झालेल्या राड्यावरुन भाजपनं एक पोस्टर तयार केलं होतं त्याला आता आपनं भाजप नेत्यांचं पोस्टर बनवून उत्तर दिलं आहे. आपनं तयार केलेल्या पोस्टरमध्ये खासदार आणि क्रिकेटर गौतम गंभीर, दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांचे फोटो असून त्यावर 'बॅलट चोर मचाए शोर' असं टायटल दिलं आहे.

काही तासांपूर्वी भाजपनं एक पोस्टर रिलिज केलं होतं. यामध्ये आम आदमी पार्टीवर टीका करण्यात आली होती. यामध्ये आपच्या नेत्या आतिशी या दिल्ली महापालिकेत ऑर्केस्ट्रा करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर आपनं देखील भाजपला प्रत्युत्तर देताना एक पोस्टर रिलिज केलं.

यामध्ये खासदार आणि क्रिकेटर गौतम गंभीर, दिल्ली भाजपचे अध्यक्ष खासदार मनोज तिवारी, नगरसेवक आणि महापौरपदाचे उमेदवार रेखा गुप्ता, चंदनकुमार चौधरी आणि भाजप प्रवक्ते हरिष खुराणा यांचे फोटो असून त्यावर 'बॅलट चोर मचाए शोर' असं टायटल दिलं आहे. तसंच या पोस्टरला 'लोकशाहीचे हत्यारे आणि मतपत्रिका चोर' असं कॅप्शन दिलं आहे.

भाजपनं जे पोस्टर तयार केलं यामध्ये आपचे आमदार अतिषी आणि दुर्गेश पाठक तसेच दिल्लीच्या महापौर शेल्ली ओबेरॉय यांचे फोटो आहेत. भाजपनं हे पोस्टर रिलिज करताना याला कॅप्शन दिलं की, आपच्या खलनायिका महापालिकेत हिंसा आणि हुकुमशाहीचा ऑर्केस्ट्रा करत आहे.

दरम्यान, दिल्लीच्या महापालिकेत महापौर निवडणुकीदरम्यान भाजप आणि आपच्या नगरसेवकांमध्ये मोठा राडा झाला होता. एकमेकांना पकडून तुफान हाणामारी घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT