Emblem of Telangana  Sakal
देश

Emblem of Telangana : तेलंगणचे राज्यचिन्ह बदलण्यास स्थगिती; मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची माघार

तेलंगणाच्या अधिकृत चिन्हांमध्‍ये बदल करताना राज्यातील सार्वजनिक जीवन, लोकशाही, तेलंगण आंदोलन, त्यासाठी दिलेले बलिदान आदी गोष्टींचे प्रतिबिंब नव्या चिन्हांमध्ये दिसेल

सकाळ वृत्तसेवा

- एम.ए.एस. कुमार

हैदराबाद : तेलंगणात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांची राज्यावरील ओळख पुसून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. केसीआर यांच्या सत्ताकाळात तयार करण्यात आलेले राज्यचिन्ह आणि राज्यातील जनतेची प्रतिकात्मक देवी तेलंगण थल्लीतही बदल करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात वादाला तोंड फुटले आहे. जनतेमध्ये वाढता असंतोष पाहून सरकारने एक पाऊल मागे घेतले आहे.

तेलंगणाच्या अधिकृत चिन्हांमध्‍ये बदल करताना राज्यातील सार्वजनिक जीवन, लोकशाही, तेलंगण आंदोलन, त्यासाठी दिलेले बलिदान आदी गोष्टींचे प्रतिबिंब नव्या चिन्हांमध्ये दिसेल, अशी त्याची रचना केली आहे. येथील राज्यचिन्हात ऐतिहासिक चारमिनार आणि काकतीय राजांच्या काळातील कमानीची मुद्रा आहे.

ते हटविण्याचा विचार रेड्डी करीत होते. तेलंगणच्या स्थापनादिनानिमित्त २ जूनला आयोजित केलेल्या समारंभात नवे प्रतीक, तेलंगण थल्लीची प्रतिमा आणि राज्यगीताचे अनावरण करण्याची योजना सरकारने आखली होती. पण २ जूनला ‘जय जय हो तेलंगण’ हे राज्यगीत प्रकाशित करण्यास आणि राज्यचिन्हात बदल करण्यास स्थगिती दिली आहे.

वाहन क्रमांकातही बदल

मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आणखी एक निर्णय म्हणजे वाहन नोंदणीच्या क्रमांकाच्या मालिकेत बदल करणे. तेलंगणात नोंदणी झालेल्या वाहनांवरील अक्षरांमध्ये आता ‘टीएस’ ऐवजी ‘टीजी’ असा बदल केला आहे.

राज्यगीताच्या संगीतकाराबद्दल आक्षेप

‘जय जय हो तेलंगण’ या गीताला ऑस्करविजेते संगीत दिग्दर्शक एम. एम. किरवानी यांनी संगीतबद्ध केले आहे. या गीताला संगीत देण्यासाठी किरवानी यांची निवड केल्याने सरकारवर टीका होत आहे. कारण किरवानी आंध्र प्रदेशातील आहेत. ही जबाबदारी तेलंगणमधील संगीतकाराला द्यायला हवी होती, असे काहींचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three-Language Policy : सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणाला मुदतवाढ? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची सूचना, अंमलबजावणी 2027-28 पर्यंत ढकलण्याची शक्यता

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT