Fake News PM Modi
देश

"प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना"; चुकूनही लिंकवर करू नका क्लिक

सध्या सोशल मीडियावर हा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

सुधीर काकडे

"पंतप्रधान रामबाण सुरक्षा योजनेतून मला ४००० मिळाले, आपणही रजिस्ट्रेशन करा" असा मेसेज जर आपल्या व्हाट्सअॅप किंवा कोणत्याही सोशल मीडियावरून आला असेल तर सावधान!

फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजकाल फेक न्यूजचा पूर आलेला दिसता आहे. सरकारच्या योजनांच्या नावाखाली बेरोजगारी भत्ता, मोफत रिचार्ज मिळवण्याच्या लिंक सध्या प्रचंड व्हायरल होता आहेत. आपल्या मोबाईलवरही ही लिंक आली असेल, तर सावध व्हा. सध्या असाच एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'प्रधानमंत्री रामबन सुरक्षा योजने'अंतर्गत, कोरोनाव्हायरसच्या मोफत उपचारांसह, केंद्र सरकार सर्व तरुणांना 4000 रुपयांची मदत देत असल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

Fake News

सोशल मीडियावर आलेल्या अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेऊन लिंकवर क्लीक करण्याआधी सावध व्हा. भारत सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नसल्याचे सिद्ध झाले आहे. पंतप्रधान रामबाण सुरक्षा योजनेसाठी रजिस्ट्रेशन सुरु आहे. या योजने अंतर्गत युवकांना ४००० रुपये मिळणार असल्याचा दावा करणारा एक मेसेज आणि त्यासोबत असलेली ती लिंक पूर्णपणे खोटी आहे.

Fake News
Fake News

या लिंकवर गेल्यावर काही कमेंट दिसतात ज्यामध्ये आम्हाला मदत मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला. यापूर्वी हे देखील व्हायरल झाले होते की ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाल्याच्या आनंदात मोदी सरकार सर्व नागरिकांना 12 महिन्यांची मोफत रिचार्ज करण्याची संधी देत ​​आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT