BJP First List 
देश

BJP First List Lok Sabha: प्रज्ञा ठाकूर...हर्ष वर्धन; भाजपने कोणत्या दिग्गजांचं कापलं तिकीट? जाणून घ्या

BJP first list of mp lok sabha election: भारतीय जनता पक्षाने शनिवारी १९५ उमेदवारांची यादी जाहीर केलीये. भाजपच्या यादीमध्ये ३४ मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

BJP first list of Candidate- लोकसभेच्या निवडणुकीची चाहुल लागली आहे. भारतीय जनता पक्षाने शनिवारी १९५ उमेदवारांची यादी जाहीर केलीये. भाजपच्या यादीमध्ये ३४ मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश आहे. ते अनुक्रमे वाराणसी, गांधीनगर आणि लखनऊ या मतदारसंघातून लढतील. (Pragya Thakur Harsh Vardhan BJP first list of mp lok sabha election 2024 has cut the ticket of which veterans)

तीन माजी मुख्यमंत्र्यांना देखील भाजपने लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. यात अपेक्षेप्रमाणे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. तसेच सर्बानंद सोनोवाल आणि विप्लव कुमार देब यांना अनुक्रमे डिब्रुगड आणि पश्चिम त्रिपुरामधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

भाजपने आपल्या रणनीतीनुसार काही दिग्गज नेत्यांचा पत्ता कट केला आहे. भाजपने याचे संकेत यापूर्वीच दिले होते. माजी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन, केंद्रीय विदेश राज्य मंत्री मिनाक्षी लेखी, केंद्रीय मंत्री रामेश्वरम तेली, केंद्रीय राज्य मंत्री जॉन बारला यांना पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. याशिवाय रमेश बिधुडी, साध्वी प्रज्ञा, केपी यादव अशा नावांना देखील वगळण्यात आलं आहे. माजी क्रिकेटर गौतम गंभीरने मुक्त करण्याची मागणी भाजपकडे केली आहे. त्यामुळे ते देखील निवडणुकीच्या रिंगणात नसतील.

भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांना गुना लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणाऱ्या साध्वी प्रज्ञा यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्या सध्या भोपाळमधून खासदार आहेत. त्यांच्या जागी आलोक शर्मा यांना तिकीट देण्यात आलंय. पश्चिम बंगालचे नेते आणि केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री जॉन बारला यांना देखील यावेळी तिकीट मिळालं नाही. त्यांच्या जागी अलीपुरद्वारमधून मनोज तिग्गा यांना उमेदवारी देण्यात आलीये.

'या' मंत्र्यांना पहिल्या यादीत तिकीट नाही

नितीन गडकरी

नारायण राणे

रावसाहेब दानवे

भागवत कराड

भारती पवार

अनुराग ठाकूर

निर्मला सीतारामण

एस. जयशंकर

पियुष गोयल

अश्विनी वैष्णव

धर्मेंद्र प्रधान

प्रल्हाद जोशी

गिरीराज सिंह

राजकुमार सिंह

हरदीप सिंग पुरी

राव इंद्रजित सिंह

अश्विनी चौबे

व्ही के सिंह

कृष्णपाल

नित्यानंद राय

एसपी सिंह बघेल

शोभा करंदलाजे

दर्शना जरदोष

मीनाक्षी लेखी

सोम प्रकाश

रामेश्वर तेली

अन्नपूर्णा देवी

ए नारायणस्वामी

अजय भट्ट

भगवंत खुबा

कपिल पाटील

प्रतिमा भौमिक

सुभाष सरकार

राजकुमार रंजन सिंह

बिश्वेश्वर तोडू

एम. महेंद्रभाई

जॉन बार्ला

एल मुरुगन

आसामच्ये डिब्रुगडचे सध्याचे खासदार रामेश्वर तेली आहेत. त्यांना यंदा डावलण्यात आलं आहे. ते केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. त्यांच्याजागी सर्बानंद सोनोवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दक्षिण दिल्ली मतदारसंघातून खासदार राहिलेले रमेश बिधुडी यांना देखील तिकीट नाकारण्यात आलं आहे. त्यांनी नुकतेच संसदेत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT