Prajjwala Challenge Scheme  Sakal
देश

Prajjwala Challenge Scheme : मोदींकडून लखपती होण्याची संधी; जाणून घ्या योजना

यासाठी तुम्हाला केवळ ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करायचा आहे.

सकाळ डिजिटल टीम

Prajjwala Challenge Scheme : मोदी सरकार चक्क तुम्हाला लखपती बनवणार आहे. यासाठी तुम्हाला केवळ ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करायचा आहे.

हेही वाचा: Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

ग्रामीण अर्थव्यवस्था बदलण्यासाठी नव-नवीन कल्पना सुचवणाऱ्या व्यक्तींना सरकारकडून दोन लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. प्रज्वललला चॅलेंजच्या माध्यमातून नागरिकांना यामध्ये नव-नवीन कल्पना सुचवण्याचे आवाहन ग्रामीण विकास मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२३ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही ३१ जानेवारीपूर्वी ऑनलाइन अर्जदेखील करू शकता.

दीनदयाल अंत्योदय योजना

राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनने ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणणाऱ्या कल्पना, उपाय आणि कृती आमंत्रित करण्याच्या उद्देशाने प्रज्ज्वला चॅलेंज योजना सुरू केली आहे.

याअंतर्गत अर्थव्यवस्था बदलू शकणाऱ्या व्यक्ती, स्टार्टअप्स, खाजगी क्षेत्रातील कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि गुंतवणूकदारांकडून नवीन कल्पना मागवण्यात येणार आहेत.

विजेत्यांना मिळणार दोन लाख

या योजनेअंतर्गत पाठवण्यात येणाऱ्या कल्पना शॉर्टलिस्ट करण्यात येणार आहेत. त्यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या कल्पनांना तज्ज्ञ पॅनेलकडून मेंटरशिप सपोर्ट आणि स्केल अप करण्यासाठी इनक्यूबेशन सपोर्ट प्रदान केले जाईल. यासोबतच अप्रतिम 5 कल्पनांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

अर्ज कसा कराल

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही www.prajjwalachallenge.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. प्रज्वाला चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२३ आहे. अर्जदार prajjwalachallenge.com या वेबसाइटवर अर्ज करू शकतात . उत्तम 5 विजेत्या अर्जदारांना सरकारकडून प्रत्येकी 2-2 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT