Prakash Ambedkar  esakal
देश

Prakash Ambedkar : संसदेचे धार्मिकीकरण धोकादायक; आंबेडकरांची मोदी सरकारवर टीका

अशोक चक्राला गौण ठरवून सेंगोलला दिली गेली असा दावा करत त्यांनी मोदी सरकारवर टीका

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : नव्या संसदभवनाचे उद्‍घाटन करताना धार्मिकतेचे केलेले अवडंबर ही संसदेचे धार्मिकीकरणाची प्रक्रिया असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. ही कृती देशाच्या लोकशाहीला घातक असल्याचे ते म्हणाले. तसेच अशोक चक्राला गौण ठरवून सेंगोलला दिली गेली असा दावा करत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले, नव्या संसद भवनाच्या उद्‍घाटनामध्ये धार्मिक विधीला काहीही स्थान द्यायला नको होते. देशाच्या संसदीय लोकशाहीमध्ये अशोक चक्राला सर्वाधिक महत्त्व आहे. या अशोक चक्राऐवजी सेंगोलची प्रतिष्ठापना लोकसभा सभागृहात करण्याचे औचित्य राहू शकत नाही.

या सर्व धार्मिक विधीमध्ये आता उत्तर व दक्षिण असे दोन गट पडले आहे. वैदिक परंपरेमध्ये उत्तर व दक्षिणेचा वाद जुना आहे. या वादाला या प्रकारामुळे पुन्हा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. यामुळे हे टाळले असते तर बरे झाले असते, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat प्रकरणात मोठा स्फोट! 58 नाही तर, 100+ व्हिडिओ असल्याची माहिती उघड, ‘तांत्रिक’ शोषणाचा काळाकुट्ट खेळ समोर

IPL 2026 Marathi News: बाळासोबत वेळ घालवायचाय... ७ सामने नाही खेळू शकणार स्टार गोलंदाज... नियमानुसार होणार बंदीची कारवाई?

तब्बल १० वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार मराठी अभिनेत्री; कधीकाळी होती सर्वांची लाडकी, आता कोणत्या मालिकेत दिसणार?

Latest Marathi News Live Update : रेडिमिक्स ट्रकवरून सिमेंट सांडत असल्याने आमदार देवयानी फरांदे आक्रमक

दिवसभर ACमध्ये बसता? तुमची इम्युनिटी कमी होतेय का? काय काळजी घ्यावी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT