Prakash Ambedkar esakal
देश

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची काँग्रेससोबत स्वतंत्र चर्चा सुरु; मल्लिकार्जून खर्गेंना लिहिलं पत्र

Prakash Ambedkar on Congress : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीये. काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गट यांच्यामध्ये वाटाघाटीसंदर्भात सातत्याने बैठका सुरु आहेत, मात्र अद्यापही मार्ग निघालेला नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित जागा मिळत नसल्यामुळे भिजत घोंगडं पडलं आहे, असा आरोप होतोय.

संतोष कानडे

Prakash Ambedkar on Congress : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटता सुटत नाहीये. काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गट यांच्यामध्ये वाटाघाटीसंदर्भात सातत्याने बैठका सुरु आहेत, मात्र अद्यापही मार्ग निघालेला नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडीला अपेक्षित जागा मिळत नसल्यामुळे भिजत घोंगडं पडलं आहे, असा आरोप होतोय.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे गटावर गंभीर आरोप करत संजय राऊत माध्यमांशी खोटं बोलत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आपण काँग्रेसशी स्वतंत्र बोलणी सुरु केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र काँग्रेसकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याची खंत आंबेडकरांनी व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये दहा जागांवर वाद आहे, त्या जागा कोणीही सोडायला तयार नाहीये. शिवाय आणखी पाच जागांवरुन मतभेद आहेत. या जागांवर शेअरिंग होऊ शकत नाही, असं काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गटाचा दावा आहे. त्यामुळे चर्चा पुढे जात नाही.

आंबेडकर पुढे म्हणाले की, वंचितचं तिन्ही पक्षांशी बोलणं झालं. परंतु आधी त्यांनी त्यांच्यात बोलणी करावी मग आमच्याशी बोलणी करावी, अशी आमच्यी भूमिका आहे. संजय राऊत वंचितविषयी मीडियाशी खोटं बोलत आहेत. तिन्ही पक्षांची भांडणं मिटलेली नसताना ते एकत्र येतील का, हाच प्रश्न आहे. आधी तु्म्ही तुमचं मिटवा, अशी आमची भूमिका आहे.

''त्यामुळे आम्ही काँग्रेसची बोलणी सुरु केली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्यातील परिस्थितीविषयी सविस्तर माहिती पत्राद्वारे दिली आहे. मात्र त्यांच्याकडून अजूनही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. तिन्ही पक्षातील चर्चा लवकरात लवकर संपतील, अशी आमची अपेक्षा आहे.'' असं प्रकाश आंबेडकर शेवटी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख - भूमिकन्यांचा सन्मान

हिवाळ्याची खास चव! घरी बनवा गरमागरम गुळाची पोळी, रेसिपी इतकी सोपी की लगेच नोट कराल

आजचे राशिभविष्य - 02 जानेवारी 2026

10th Pass Govt Jobs: दहावी पास असाल? मग ही दिल्लीतील सरकारी नोकरी चुकवू नका, लगेच करा येथे अर्ज

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT