Prakash Javadekar attacks Rahul Gandhi 
देश

राहुल गांधींच्या कामगिरीची प्रकाश जावडेकरांनी अशी घेतली दखल !

सकाळ डिजिटल टीम

पुणे : सगळा देश कोरोनाविरुद्ध लढा देत असताना, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गेल्या सहा महिन्यांच्या काळात दर महिन्यात केलेल्या 'चमकदार' कामगिरीची दखल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे राहुल यांचे 'अभिनंदन'ही केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 

जावडेकर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये राहुल गांधी यांच्या या 'दिमाखदार' कामगिरीची दखल घेतली आहे. उपरोधिकपणे लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी राहुल यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. त्यात असे म्हटले आहे की, सगळा देश कोरोनाविरुद्धच्या लढ्यात उतरला आहे. त्यामुळेच अमेरिका, युरोप, ब्राझिल या देशांच्या तुलनेत भारतातील रुग्णसंख्या वाढीची सरासरी कमी आहे. तसेच मृत्यूदरही अत्यल्प आहे. देशातील सगळी राज्य, प्रशासन, वैद्यकीय क्षेत्र, सर्वसामान्य नागरिक हा लढा लढत असताना, राहुल यांनी त्यांचा अपमान केला आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी राहुल गांधी यांनी काय केले आहे, कॉंग्रेसने कोणती सकारात्मक पावले उचलली आहेत, असा प्रश्नही जावडेकर यांनी उपस्थित केला आहे. 

दिल्लीतील शाहिनबाग प्रकरण असो अथवा चीनची लडाखजवळील गोतलाम खिंडीतील आगळीक, तसेच मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील कॉंग्रेसच्या लाथाळ्या,  याबद्दल टिपण्णी करताना जावडेकर यांनी त्यातील राहुल गांधी यांची 'कामगिरी', अधोरेखित केली असून या फेसबुक पोस्टला नेटिझन्सने प्रतिसादही चांगला दिला आहे.

- फेब्रुवारी - शाहिनबाग प्रकरण आणि त्यामुळे भडकलेल्या दंगली
- मार्च - मध्य प्रदेशात ज्योर्तिराजे शिंदे यांना गमावले आणि मध्य प्रदेशातील सत्ताही
- एप्रिल - श्रमिक, कष्टकऱयांना भडकावले 
- मे - कॉंग्रेसच्या देशातील ऐतिहासिक पराभवाला सहा वर्षे पूर्ण 
- जून - चीनचे जोरदार समर्थन 
- जुलै - राजस्थानमध्ये कॉंग्रेसमधील लाथाळ्या उघड 

प्रकाश जावडेकर पुण्यातील असून त्यांचे कुटुंबियही पुण्यात असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग दुसऱयांदा मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ जावडेकर दिल्लीत असून तेथे त्यांनी चांगले बस्तान बसविले आहे. मात्र, अद्यापही त्यांना लोकसभेसाठी सुरक्षित मतदारसंघ महाराष्ट्रात मिळालेला नाही. त्यामुळे दुसऱया टर्मसाठी मध्य प्रदेशातून त्यांना राज्यसभेत पोचावे लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT