prakash javdekar
prakash javdekar 
देश

रामायण बघतानाचा फोटो डिलीट करून जावडेकरांनी टाकला 'हा' फोटो

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक साथीच्या मुकाबल्यासाठी १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाउन मुळे घराघरांमध्ये सक्तीने बंद होऊन राहावे लागणाऱ्या नागरिकांसाठी दूरदर्शनने आजपासून (शनिवार) रामायण या गाजलेल्या मालिकेचे पुनःप्रसारण सुरु केले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रामायण बघतानाचा फोटो ट्विट केला. पण, नागरिकांनी त्यांनी एकीकडे नागरिक चालत गावी परतत आहेत आणि मंत्री रामायण पाहत असल्याचे ट्विट करत ट्रोल केल्याने अखेर जावडेकर यांनी ट्विटर अकाउंटवरून डिलीट करत काम करत असल्याचा फोटो ट्विट केला आहे.

जावडे यांनी मी रामायण पाहत आहे, तुम्ही असा प्रश्न केला होता. जावडेकर यांना या फोटोवरून ट्विटरवर जोरदार ट्रोल करण्यात आले. मंत्री आपल्या घरात मस्त रामायण पाहण्याचा आनंद घेत आहेत. तर, रस्त्यावर महाभारत घडत आहे, असे ट्विट करण्यात आले. दिल्ली, जयपूर, हैदराबाद येथून हजारो मजूर काम नसल्याने आपल्या गावी परतत  आहेत. वाहतूक बंद असल्याने आपल्या कुटुंबियांना घेऊन ते चालत जात आहेत. यावरून सरकारच्या उपाययोजनांवर टीका करण्यात येत आहे. त्यानंतर जावडेकर यांनी रामायण पाहतानाचा फोटो डिलीट केला. अन् घरातून काम करत असल्याचा फोटो शेअर केला. यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की आता घरच ऑफिस झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत मी आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधत आहे.

आजपासून डीडी नॅशनल वाहिनीवर सकाळी नऊ ते दहा आणि रात्री नऊ ते दहा या वेळेत रोज दोन भाग प्रसारित करण्यात आली. ही मालिका पाहताना अनेक फोटो काढून ट्विट केले असून, आपल्या मुलांसह आता रामायण पाहत असल्याचे म्हटले आहे. रामानंद सागर लिखित आणि निर्मित मालिका दूरदर्शन वर २५ जानेवारी १९८७ ते ३१ जुलै १९८८ या कालावधीत प्रसारित करण्यात आली होती त्यानंतर २००८ आणि २०१२ मध्ये खासगी वाहिन्यांनी तिचे पुन्हा प्रसारण केले. रामायणामध्ये अरुण गोवील, दीपिका चिखलिया, दारासिंह, ललिता पवार, बाळ धुरी यांनी प्रमुख पात्रांच्या भूमिका केल्या होत्या. पुढे रामजन्मभूमी आंदोलनात भाजपने यातील अनेकांना संसदेवर निवडून आणले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT