prakash jha  esakal
देश

Prakash Jhaच्या 'आश्रम' वेब सीरिजवरुन नवा वाद,बजरंग दल आक्रमक

भोपाळ येथे प्रकाश झा निर्मित असलेल्या 'आश्रम -३' या वेब सीरिजच्या चित्रीकरणाच्या वेळी हिंसा घडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : भोपाळ येथे प्रकाश झा निर्मित असलेल्या 'आश्रम -३' या वेब सीरिजच्या चित्रीकरणाच्या वेळी हिंसा घडली आहे. वादाचे कारण आहे वेब सीरिजचे नाव. नाव बदलण्याची मागणी बजरंग दलाकडून होत आहे. रविवारी (ता.२४) बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी झा यांच्या चेहऱ्याला शाई लावून आश्रमच्या सेटचे नुकसान केले आहे. आज मध्य प्रदेशचे गृहमंत्री यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, की वेब सीरिजच्या नाव बदलाच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. तुम्ही धाडस करुन दुसरे नाव देऊ शकत नाहीत का ?, असा प्रश्न त्यांनी प्रकाश झा यांना केला आहे. (Ashram-3 Web Series)

अशा काही गोष्टी (Prakash Jha) करु नका, ज्याच्यामुळे अडचणी निर्माण होतील. आश्रम वेब सीरिजच्या सेटवर जे काही घडले, ते चुकीचे आहे. चार जणांना अटक करण्यात आली आहे. तुम्ही जे काही करत आहात ते चुकीचे आहे, त्यावर विचार करा, असा सल्ला गृहमंत्री मिश्रा यांनी झा यांना दिला आहे. आश्रम या वेबसीरिजमध्ये अभिनेता बाॅबी देओल हा मुख्य भूमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: गॅसटंचाईमुळे ठाण्यातील ६० टक्के हॉटेल्स बंद, व्यावसायिकांचे चुलीवर स्वयंपाक करत आंदोलन

Pune Traffic: महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे उद्यापासून पुण्याच्या वाहतुकीत बदल; लोणीकंद-खराडी मार्गावर अवजड वाहनांना बंदी

Maharashtra Heatwave: अलर्ट! राज्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता, उष्णतेची लाट ओसरली

Latest Marathi News Live Update : साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Pune Crime : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT