nehru pranab mukharjee 
देश

नेपाळला भारतात सामावण्याची ऑफर नेहरुंनी नाकारली; मात्र इंदिरा गांधी असत्या तर...

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी नेपाळला भारतात समाविष्ट करण्यासंबंधीची राजा त्रिभुवन बीर विक्रम शाह यांची ऑफर धुडकावून लावली होती, असा दावा भारताचे राष्ट्रपती दिवंगत प्रणब मुखर्जी यांच्या बहुचर्चित आत्मचरित्रात केला गेलाय. . प्रणब मुखर्जी यांनी आपले पुस्तक ‘द प्रेसिडेंसियल ईयर्स, 2012-2017' मध्ये यांवर मते मांडली आहेत. त्यांनी हे पुस्तक आपल्या निधनाच्या आधी एक वर्ष लिहलं होतं. रुपा प्रकाशनाद्वारे प्रकाशित केलेले हे पुस्तक मंगळवारी बाजारात उपलब्ध झाले आहे. पुस्तकातील 11 वे प्रकरण माय प्राइम मिनिस्टर: डिफरंट स्टाइल्स, डिफरंट टेम्परामेंट्स (My Prime Ministers: Different Styles, Different Temperaments) या शीर्षकाखाली मुखर्जी यांनी लिहलंय की, नेपाळमध्ये राणा शासनानंतर राजेशाहीने जागा घेतल्यानंतर त्यांनी नेहरु यांना हा सल्ला दिला होता की नेपाळला भारताचा एक प्रांत बनवले जावे. मात्र, तत्कालिन पंतप्रधानांनी या प्रस्तावाला नाकारलं. नेहरु यांचं म्हणणं होतं की, नेपाळ एक स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्याला तसंच राहिलं पाहिजे.

माजी पंतप्रधानांच्या तसेच राष्ट्रपतींच्या कार्यशैलीबाबत मते व्यक्त करताना त्यांनी म्हटलंय की, प्रत्येक पंतप्रधानाची काम करण्याची स्वत:ची अशी खास शैली असते. जवाहरलाल नेहरुंहून एका वेगळ्या परिप्रेक्ष्यात लाल बहादुर शास्त्रींनी पंतप्रधान पद स्विकारले. जरी बरेच पंतप्रधान एकाच पक्षातले असले तरीही परराष्ट्र नीती, सुरक्षा आणि अंतर्गत प्रशासनाबाबत प्रत्येकाची मते वेगवेगळी होती. 

नेहरुंनी नेपाळसोबत अत्यंत धोरणी पद्धतीने व्यवहार केला. राणा राजवटीची जागा नेपाळमधील राजशाहीने घेतल्यानंतर लोकशाही रुजली पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे नेपाळचा राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांनी नेहरूंना नेपाळ हा भारताचा प्रांत बनविण्याची विनंती केली होती. पण नेपाळ हे स्वतंत्र राष्ट्र होते आणि नेहरूंनी हे कायम ठेवले पाहिजे. या कारणावरून नेहरूंनी ही ऑफर नाकारली.
जर याठिकाणी इंदिरा गांधी पंतप्रधान असत्या तर त्यांनी ही संधी नाकारली नसती. सिक्कीम प्रमाणे त्यांनी या संधीचं सोनं केलं असतं. मुखर्जींच्या या पुस्तकावरुन त्यांच्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये असलेला वाद समोर आला होता. त्यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी चिंता व्यक्त करत म्हटलं होतं की, हे पुस्तक प्रकाशित करु नये. तर काँग्रेसच्या प्रवक्त्या असलेली त्यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपल्या भावाला पुस्तक प्रकाशनात कोणतीही बाधा न आणण्याची विनंती केली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT