देश

कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सुचवला उपाय; म्हणाले...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिवस आज सगळीकडे साजरा केला जात आहे. परंतु यंदाचा हा योगदिवस सार्वजनिक गर्दी टाळून साजरा केला जात आहे. त्यामुळे हा योग दिवस डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी स्वत: योगाही केला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या सृदृढ आरोग्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी योगासने करण्याचेही मोदींनी सूचवले. 

पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून पहिल्यांदाच हा दिवस आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर होत आहे. पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, योग दिन हा विश्व बंधुत्त्वाचा संदेश देणारा दिवस आहे. कोरोना व्हायरस आपल्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो. मात्र, प्राणायम केल्यास ही यंत्रणा मजबूत होते. अनुलोम-विलोम, भ्रामरी यांसारखे प्राणायम करण्याचे प्रकार आहेत. प्राणायम केल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, 'योगा अ‍ॅट होम, योगा विथ फॅमिली' असे यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य आहे. आज सकाळी सात वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ऑनलाईनच्या माध्यमातून योग दिवस साजरा केला गेल्याने देशातील अनेकांनी घरबसल्या योग दिन साजरा केला. 

आयुष मंत्रालयाकडूनही तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावानुसार 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 11 डिसेंबर 2014 रोजी घेतला होता.  त्यानुसार दरवर्षी योगदिवस साजरा केला जात आहे. तसेच यंदाच्या योगदिनी लेह येथे मोठा कार्यक्रम घेण्याची तयारी आयुष मंत्रालयाने केली होती. मात्र, कोरोना व्हायरसच्या साथीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. 

कोरोनावर मात करण्यासाठी मदत

कोरोना व्हायसरचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती सर्वात जास्त गरजेची आहे. त्यामुळे नियमित व्यायाम आणि योगाच्या साहाय्यानेच कोरोनावर मात करता येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT