prashant bhushan main.jpg 
देश

सरन्यायाधीशांवरील टि्वट; प्रशांत भूषण यांनी 'चुकी'बद्दल मागितली माफी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी आपल्या एका टि्वटमधील चुकीबाबत खेद व्यक्त केला आहे. प्रशांत भूषण यांनी 21 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यावर टीका करणारे एक टि्वट केले होते. मध्य प्रदेश सरकारने सरन्यायाधीशांना विशेष हेलिकॉप्टर उपलब्ध करुन दिले होते. त्यावरुन त्यांनी टीका केली होती. 

काय म्हटलं होतं टि्वटमध्ये

प्रशांत भूषण यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले होते की, 'कान्हा राष्ट्रीय उद्यानच्या दौऱ्यावेळी सरन्यायाधीशांनी विशेष हेलिकॉप्टरची सेवा घेतली आहे, ते देखील अशा वेळी जेव्हा पक्ष बदलणारे खासदार, आमदार अपात्र ठरवल्याचा खटला त्यांच्यासमोर प्रलंबित आहे. मध्य प्रदेश सरकार या खटल्यावर अवलंबून आहे.' आता आपल्या या टि्वटबाबत त्यांनी खेद व्यक्त केला आहे. 

प्रशांत भूषण यांनी खेद व्यक्त करत टि्वट केले की, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सोडून शिवराजसिंह सरकारमध्ये मंत्री झालेल्या काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघात मतदान झाले. शिवराज सरकार टिकणार की नाही, हे या आमदारांच्या विजयावर अवलंबून आहे. सरन्यायाधीशांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या निर्णयावर नाही. मी टि्वटमध्ये माझ्या चुकीवर खेद व्यक्त करतो. 

दरम्यान, सरन्यायाधीशांवर आरोप करण्याची प्रशांत भूषण यांची पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी असे केले आहे. याचवर्षी 31 ऑगस्ट रोजी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना 1 रुपयांचा दंड ठोठावला होता. भूषण यांनी त्यावेळी विद्यमान सरन्यायाधीश आणि इतर 4 माजी सरन्यायाधीशांबाबत 2 वादग्रस्त टि्वट केले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील मुंबई दौरा रद्द करणार? प्रकृतीवर परिणाम; पुढचा निर्णयही सांगितला

शाळेतल्या मित्राने PM मोदींची भेट घेतली, आता भाजप आमदाराने मित्राच्या मुंबईतील जमिनीवरचा ताबा सोडला

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

SCROLL FOR NEXT