

Manoj Jarange Patil Maratha Reservation News
esakal
Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणामुळे प्रकृतीवर परिणाम होत असल्याचे सांगत पुढील दौरा रद्द करण्याचे संकेत दिले. पाटोदा येथे रात्री दोनच्या सुमारास झालेल्या सभेत त्यांनी सरकारवर टीका करत आरक्षणाच्या मागणीवरून माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले.