Prashant Kishor And Rahul Gandhi sakal media
देश

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'येथून' सुरू व्हायला हवी होती; प्रशांत किशोर यांचं मत

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : काँग्रेसच्या वतीने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेसंदर्भात राजकीय रणनीतीकार आणि काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा असलेले प्रशांत किशोर यांनी मंगळवारी महत्त्वपूर्ण विधान केलं. काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' गुजरात किंवा भाजपशासित इतर कोणत्याही राज्यातून सुरू व्हायला हवी होती, असं मत त्यांनी मांडलं. वेगळ्या विदर्भ राज्याच्या समर्थनार्थ स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांकडून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

काँग्रेसच्या यात्रेबद्दल विचारले असता किशोर म्हणाले, "काँग्रेसने आपली भारत जोडो यात्रा गुजरातमधून सुरू करायला हवी होती. या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत. अन्यथा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यांमधून यात्रेला सुरुवात व्हायला हवी होती, असंही ते म्हणाले.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला तामिळनाडूतून सुरुवात झाली. या वर्षाच्या सुरुवातीला किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती, परंतु नंतर त्यांनी निवडणूक रणनीतीचे नेतृत्व करण्याची काँग्रेसची ऑफर नाकारली.

वेगळ्या विदर्भाबाबत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले की, वेगळ्या राज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी येथील जनतेने एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. लोकांमध्ये आशा निर्माण झाली, तर विदर्भ राज्याचा विचार पुढे नेता येईल. ही चळवळ केंद्रापर्यंत पोहोचली पाहिजे. त्याचा राष्ट्रीय परिणाम व्हायला हवा, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT