Prashant Kishor and soniya gandhi sakal
देश

‘पीकें’नी धुडकाविला काँग्रेसचा प्रस्ताव

पक्षप्रवेशास नकार, सामूहिक इच्छाशक्तीची गरज असल्याचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेस प्रवेशाची सोनिया गांधींची विनंती निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी धुडकावली आहे. निवडणुकीची जबाबदारी सांभाळण्याच्या प्रस्तावास प्रशांत किशोर आज स्पष्ट शब्दांत नकार देताना, काँग्रेसला आपल्यापेक्षा ‘नेतृत्वाची आणि सामूहिक इच्छाशक्तीची’ गरज असल्याचा सल्लाही दिला आहे.

काँग्रेसचा प्रस्ताव नाकारत असल्याचे ट्विट प्रशांत किशोर यांनी आज केले. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही ट्विटरवरून ही माहिती दिली. प्रस्तावाला नाकातानाच प्रशांत किशोर यांनी नेतृत्व आणि पक्षातील सुधारणांवरून काँग्रेसला चिमटे काढण्याचीही संधी त्यांनी साधली. प्रशांत किशोर यांनी म्हटले, की काँग्रेस पक्षात सहभागी होऊन विशेषाधिकार प्राप्त गटाचा सदस्य होण्याचा प्रस्ताव मी नाकारला आहे. माझ्या मते, मूलभूत संघटनात्मक समस्या आणि त्यातील सुधारणांसाठी काँग्रेसला माझ्यापेक्षा नेतृत्व आणि सामूहिक इच्छाशक्तीची अधिक गरज आहे.

मागील काही दिवसांपासून प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसमवेत त्यांची चर्चा झाली होती. यात निवडणुकांसोबतच काँग्रेसच्या संपर्क रणनितीबाबतच्या सूचना देणारे सादरीकरणही प्रशांत किशोर यांनी केले होते. या सूचनांचा विचार करण्यासाठी सोनिया गांधींनी आठ वरिष्ठ सदस्यांची समिती नेमली होती. या समितीने २१ एप्रिलला आपला अहवाल सादर केल्यानंतर सोनिया गांधींनी आगामी विधानसभा निवडणुकांसह २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या रणनितीसाठी विशेषाधिकारप्राप्त कृती गट २०२४ स्थापन करण्याची घोषणा काल (ता. २५) केली होती. या कृतीगटामध्ये प्रशांत किशोर यांचा देखील सहभाग राहील, असेही सांगितले जात होते. मात्र या निर्णयानंतरच्या अवघ्या काही तासांतच प्रशांत किशोर यांनी या विशेषाधिकार प्राप्त कृती गटाचा सदस्य बनण्यास आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास स्पष्ट नकार दिला. प्रशांत किशोर यांनी व्यावसायिक सल्लागाराच्या भूमिकेत न राहता पक्षाचे औपचारिक सदस्य व्हावे आणि निवडणुकीची जबाबदारी सांभाळावी, असे काँग्रेसने सांगितले होते.

सल्ला घेण्याचा पर्याय खुलाच

औपचारिक नकारानंतरही निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांचा सल्ला घेण्याचा पर्याय काँग्रेसने खुला ठेवल्याचे समजते. सल्लागार या नात्याने प्रशांत किशोर यांनी अन्य पक्षांप्रमाणेच काँग्रेसलाही आपली सेवा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, व्यावसायिक या नात्याने बाहेरून सल्ला द्यावा की पक्षात सहभागी काम करावे हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्याला त्यांनी नकार दिला आहे. त्यांच्या सेवांचा वापर करावा की नाही यावर पक्षात नंतर निर्णय केला जाईल, असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

नकारामागील कारणांची चर्चा

काँग्रेसचा प्रस्ताव आणि प्रशांत किशोर यांच्या नकारामागच्या कारणांचीही चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये त्यांच्या ‘आयपॅक’ कंपनीने तेलंगणात तेलंगण राष्ट्र समिती या पक्षाशी केलेला करार रद्द करावा अशी काँग्रेसची मागणी, यापासून ते काँग्रेसकडून त्यांनी अधिक मोबदला मागितला, अशी कारणे सांगितली जात आहेत. याशिवाय, निवडणूक रणनितीबाबत पक्षातील अन्य नेत्यांना नव्हे तर सोनिया गांधींनाच आपण अहवाल सादर करू, असेही प्रशांत किशोर यांचे म्हणणे असल्याचे सांगितले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT