Prataprao Pawar sakal
देश

Prataprao Pawar : प्रतापराव पवार यांचा ‘बिट्स पिलानी’कडून गौरव

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना झुआरीनगर (गोवा) येथील ‘बिट्स पिलानी’च्‍या दीक्षांत समारंभात आज पश्चिम बंगालचे राज्‍यपाल डॉ. सी. व्ही. आनंद बोस यांच्या हस्ते गौरवण्‍यात आले.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

पणजी - सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांना झुआरीनगर (गोवा) येथील ‘बिट्स पिलानी’च्‍या दीक्षांत समारंभात आज पश्चिम बंगालचे राज्‍यपाल डॉ. सी. व्ही. आनंद बोस यांच्या हस्ते गौरवण्‍यात आले. सामाजिक तसेच उद्योग जगतामधील देदीप्‍यमान कामगिरी आणि भरीव योगदानाची दखल घेऊन ‘कॉर्पोरेट लीडरशिप श्रेणी’अंतर्गत प्रतिष्ठित माजी विद्यार्थी व स्‍नातक या नात्‍याने सन्‍मान करण्‍यात आला.

बिट्स पिलानी, झुआरीनगर कॅम्पसमध्ये २०२२-२३ तुकडीचा दीक्षांत सोहळा रविवारी दिमाखात झाला. या प्रसंगी सहा जणांचा गौरव करण्‍यात आला. व्यासपीठावर कर्नल एस. चक्रवर्ती, प्रमुख अतिथी डॉ. संघमित्रा बंडोपाध्याय, बिट्स पिलानीचे कुलगुरू प्रो. व्ही. रामगोपाल राव, बिट्स पिलानीचे संचालक प्रो. सुमन कुंडू व इतर मान्यवर उपस्‍थित होते.

पवार यांच्या गौरव सोहळ्याप्रसंगी आयोजकांनी त्‍यांच्‍या कार्याचा समग्र आढावा घेतला. बिट्स पिलानीचे माजी विद्यार्थी व स्‍नातक म्‍हणून आम्‍हाला अभिमान आहे, असेही उद्‍गार मान्‍यवरांनी काढले. प्रतापराव पवार हे अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थांचे विश्वस्त आहेत आणि या संस्था नागरी विकासात सक्रिय सहभाग घेतात. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील सेवेबद्दल प्रतापराव पवार यांना २०१४ मध्ये भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ने सन्‍मानित करण्‍यात आले.

प्रा. मिलिंद तांबे यांचा सन्मान

प्रा. मिलिंद तांबे यांना त्यांच्या सामाजिक अतुलनीय योगदानाची दखल घेऊन शैक्षणिक आणि संशोधन या श्रेणीतील प्रतिष्ठित माजी विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. भरीव कर्तृत्वाद्वारे प्रा. मिलिंद तांबे यांनी बिट्स पिलानी संस्थेचे नाव उज्‍ज्‍वल केले आहे.

तांबे यांनी १९८६ मध्ये बिट्स पिलानीमधून संगणक शास्त्रात एम. एस्सी. (टेक) आणि त्यानंतर १९९१ मध्ये कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली. ते सध्या संगणक विज्ञान विषयाचे जॉर्डन मॅके येथे प्रोफेसर आहेत आणि सेंटर फॉर रिसर्च इन कॉम्प्युटेशन अँड सोसायटी (सीआरसीएस), हार्वर्ड विद्यापीठाचे संचालक आहेत. त्यांनी ९५७८ संदर्भासह ४४४ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT